adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गुरुपौर्णिमा महोत्सव 2025 – राष्ट्रप्रेम जागवणारा प्रेरणादायी उपक्रम!

  गुरुपौर्णिमा महोत्सव 2025 – राष्ट्रप्रेम जागवणारा प्रेरणादायी उपक्रम! विकास पाटील धरणगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) पाळधी (ता. धरणगाव, ज...

 गुरुपौर्णिमा महोत्सव 2025 – राष्ट्रप्रेम जागवणारा प्रेरणादायी उपक्रम!

विकास पाटील धरणगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

पाळधी (ता. धरणगाव, जि. जळगांव): 'हिंदु जनजागृती समिती'तर्फे गुरुवार, १० जुलै २०२५ (आषाढ पौर्णिमा, कलियुग वर्ष ५१२७) रोजी सायं. ५.३० वाजता, सुगोकी लॉन्स, पाळधी येथे गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण जग युद्धाच्या उंबरठ्यावर असताना, भारतातही जिहादी आतंकवाद्यांकडून हिंदूंची हत्या करून भारताला युद्धाकडे ओढले जात आहे. अशा काळात ‘प्रत्येक नागरिक सैनिक असतो’ हे लक्षात घेऊन राष्ट्ररक्षणाची प्रेरणा देणारा हा महोत्सव ठरणार आहे. भगवान श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांच्यासारख्या थोर व्यक्तींनी धर्म व राष्ट्ररक्षणासाठी गुरुपरंपरेचा आदर्श घेऊन लढे दिले. या परंपरेची जाणीव जागवण्यासाठी हा महोत्सव साजरा होत आहे.

कार्यक्रमाचे ठळक आकर्षण:

१)महर्षि व्यास आणि गुरुपरंपरेचे पूजन

२)राष्ट्र व धर्म रक्षण करणाऱ्यांचा सत्कार

३)संतांचे संदेश व कार्यकर्त्यांचे अनुभव

४)लघुपट व स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिक

५)सामूहिक जप व व्याख्यान – “साधना म्हणजे राष्ट्रधर्म रक्षण”

६)राष्ट्र व धर्म जागृती प्रदर्शने

_या महोत्सवात आपल्या कुटुंबीयांसह, तसेच मित्र-परिवारासह मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे._

स्थळ: सुगोकी लॉन्स, पाळधी, ता. धरणगाव, जि. जळगांव

वेळ: सायंकाळी ५.३० वा.

संपर्क: 9552426439

आयोजक: हिंदु जनजागृती समिती

अधिक माहितीसाठी भेट द्या: www.HinduJagruti.org

No comments