समाजसेवेचा वसा हाती घेऊन जमातीसाठी 25 वर्षापासून लढणार नेतृत्व म्हणजे गणेश इंगळे बुलडाणा:- आपण आपल्या जमातीचे काहीतरी लागतो या भावनेने गेल...
समाजसेवेचा वसा हाती घेऊन जमातीसाठी 25 वर्षापासून लढणार नेतृत्व म्हणजे गणेश इंगळे
बुलडाणा:- आपण आपल्या जमातीचे काहीतरी लागतो या भावनेने गेली 25 वर्ष पासून कोळी महादेव जमातीच्या न्यायहक्कासाठी लढत असणारे बुलडाणा येथील गणेश इंगळे यांनी समाजसेवेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र मधील कोळी जमातीत आपल्या नावाचा समाजसेवी ठसा उमटविला आहे जमातिला न्याय मिळावा यासाठी 25 वर्ष पासून त्यांचा संघर्ष चालूच आहे त्यांचा जिल्ह्यातील प्रत्येक गावात वाल्मिकी जयंतीत उत्साही सहभाग असून त्यांनी मागील काळात जमातीच्या न्यायहक्कासाठी पोलीस स्टेशनची कामे हाताळणे/आदिवासी कोळी जमातीच्या कोणत्याही जमात बांधवांवर अन्याय झाल्यास सर्वप्रथम पुढाकार घेऊन न्याय देण्याचा प्रयत्न करणे तसेच धरणे,उपोषण,रस्तारोको, मंत्रालय पायदळ मोर्चे मध्ये सहभाग घेऊन त्यांनी विविध प्रकारच्या रुद्ररुपी भूमिका घेतल्या आहे तर कधी रक्तदान शिबिरे घेऊन रक्ताची गरज असलेल्या पेशंटला सहकार्य केले त्यांचा कार्याने बुलडाणा जिल्ह्यातील कोळी जमात बांधवांच्या मनामध्ये गणेश इंगळे यांनी घर केले आहे हे नक्कीच.. आज त्यांचा वाढदिवस त्यांना हार्दिक शुभेच्छा व त्यांचा हातून सदैव असेच समाजहिताचे कार्य घडत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो....
अमोल बावस्कार विभागीय संपादक नेशन महाराष्ट्र,
जिल्हा युवा अध्यक्ष महाराष्ट्र कोळी समाज संघ

No comments