श्री संत वियोगी महाराज आश्रम वडनेर येथे निसर्ग प्रेमीं ग्रुप च्या वतीने ३५१ विविध प्रजातींच्या झाडांची लागवड.. अमोल बावस्कार बुलढाणा (संप...
श्री संत वियोगी महाराज आश्रम वडनेर येथे निसर्ग प्रेमीं ग्रुप च्या वतीने ३५१ विविध प्रजातींच्या झाडांची लागवड..
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
नांदुरा :- इंजि.सचिन तायडे, मनोहर लाड,संदीप गावंडे यांच्या संकल्पनेतून व सर्व निसर्ग प्रेमीं यांच्या पुढाकारातून तालुक्यातील वियोगी आश्रम वडनेर येथे दिनांक ५ जुलै ला निसर्ग ग्रुप च्या वतीने विविध प्रजातींच्या ३५१ वृक्षांची लागवड करण्यात आली.
मानव हा मुळात निसर्गाचा एक घटक असून निसर्गाच्या सर्वांगीन उपलब्धी शिवाय माणसाचं जीवन अपूर्णच! याचीच जाणीव उराशी ठेवून नांदुरा येथील निसर्ग प्रेमीं ग्रुप च्या वतीने जवळपास चार ते पाच वर्षापासून विविध ठिकाणी विविध प्रजातींची वृक्ष लागवड करण्यात येते. याआधी बर्डेश्वर टेकडी,निंबा देवी संस्थान निंबोळा, तालुक्यातील इतर गावालगतची माळराने,टेकड्या याठिकाणी बऱ्याच बहुपयोगी वृक्षांची लागवड करण्यात आली असून काही वर्षा पूर्वी निंबोळा येथे लावलेल्या वटवृक्षांची तर तेथील मंदिराला छान जैविक "तट" संरक्षण भिंत तयार झाली आहे.
यावर्षी सुद्धा श्री संत वियोगी महाराज आश्रम वडनेर येथे विविध संघटना, प्रशासकीय अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील नामवंत व्यवसायिक, उद्योजक अश्या पर्यावरण प्रेमींचा भरणा असलेल्या निसर्ग ग्रुप यांच्या वतीने खूप उत्साहात आणि जोशात हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कैलास भाऊ गावंडे विदर्भ ठिबक कंपनी यांनी ड्रिप इरिगेशनची सोय स्वखर्चातून करून देण्याचा मानस बोलून दाखवला तसेच संदीप भाऊ गावंडे आशीर्वाद नर्सरी धानोरा यांनी संपूर्ण झाडे मोफत दिली. यावेळी नांदुरा तालुक्यासह आजूबाजूच्या परिसरातील निसर्गप्रेमी मंडळी उपस्थित होती.



No comments