साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त 31 जुलै रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.. वाशीम प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ...
साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त 31 जुलै रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन..
वाशीम प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
वाशीम येथील श्री.नाथमंगल कार्यालय, मन्नासिंह चौक , पुसद नाका या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन डॉ. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती वाशिम च्या वतीने करण्यात आले आहे.
हे रक्तदान शिबिर दिनांक 31 जुलै 2025 रोजी आयोजित करण्यात आले आहे. रक्तदान शिबिराची वेळ सकाळी 11 ते 2 या दरम्यान राहणार आहे, तरी वाशिम मधील सर्व मातंग समाजासह सर्व समाजातील बंधू आणि भगिनींनी रक्तदान शिबिराला बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या 1 ऑगस्ट जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन याही वर्षी करण्यात आले आहे .रक्तदान करणे हे शरीरासाठी आवश्यक आहे, रक्तदान केल्याने नव्या रक्तपेश्या तयार होतात आणि रक्तभिसरण प्रक्रिया चांगली होते. म्हणून प्रत्येक व्यक्तीने वर्षातून दोन वेळा रक्तदान केले पाहिजे आणि रक्तदान केल्याने नव्या व्यक्तीला जीवनदान मिळते. रक्तदान केल्याने कोणतेही वाईट परिणाम शरीरावर होत नाहीत. तरी प्रत्येक व्यक्तीने रक्तदान करावे असे आव्हान जगदीश मानवतकर यांनी केली आहे.
यावेळी साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती अध्यक्ष श्रावण भाऊ खडसे,उपाध्यक्ष अजयभाऊ रणखांब , ज्येष्ठ मार्गदर्शक संजय भाऊ वैरागडे, जगदीश भाई इंगळे, विनोद भाऊ जोगदंड, नारायण डाखोरे , विजय भाऊ लोंढे , विनोद भाऊ आवारे , प्रल्हाद लगड, अनिल कांबळे , संतोष आवारे , संतोष इंगळे , रामेश्वर पाटोळे, श्याम उफाडे ,माणिक बांगर, ॲड.रवींद्र गायकवाड, आत्माराम सुतार, आनंद सुतार, पंकज भाऊ गायकवाड, महादेव आवारे, गजानन कुचेकर, दिलीप गायकवाड, यांच्यासह वाशिम मधील सर्व मातंग समाज बांधवांसह सर्व समाजातील बांधवांनी भगिनींची उपस्थिती लाभणार आहे. वाशिम मधील सर्व रक्तदात्यांनी रक्तदान करावे अशी आव्हान जगदीश मानवतकर आणि जयंती उत्सव समिती वाशिम यांच्या वतीने करण्यात आले आहे.


No comments