पहिल्या श्रावण सोमवारी श्री गुप्तेश्वर महादेव मंदिरात शिवभक्तांचा उत्साह चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपड्यातील गणेश कॉलन...
पहिल्या श्रावण सोमवारी श्री गुप्तेश्वर महादेव मंदिरात शिवभक्तांचा उत्साह
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपड्यातील गणेश कॉलनी येथील श्री गुप्तेश्वर महादेव मंदिरात आज पहिल्या श्रावण सोमवार निमित्त धार्मिक व सांस्कृतिक वातावरणात भाविकांनी महादेवाचे दर्शन घेतले. या विशेष प्रसंगी माननीय मुख्याधिकारी श्री. राहुल पाटील साहेबांचा मंदिर समिती सदस्यांनी सत्कार करून त्यांना पहिल्या आरतीचा मान देण्यात आला. नागरिकांच्या विनंतीला साद देत साहेबांनी "भोलेनाथ शंकरा" या गाण्यावर मंत्रमुग्ध करणारे बासरी वादन केले आणि संपूर्ण वातावरण शिवमय झाले.
नागरिकांशी संवाद व समस्यांचा आढावा
सत्कारानंतर गणेश कॉलनीतील नागरिकांनी साहेबांना परिसरातील काही समस्या मांडल्या. अलीकडील सततच्या धार पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणींवर निश्चित तोडगा काढण्याचे आश्वासन साहेबांनी दिले.
महादेव मंदिर समितीचे सदस्य –
श्री. सुभाष बापू पाटील, श्री. ए. पी. (अण्णा) पाटील, डॉ. अतुल पाटील, श्री. डी. एम. पाटील सर, नंदकिशोर भानुदास पाटील, श्री. राजूभाऊ महाजन, श्री. मनोज चौधरी, श्री. प्रवीण राजपूत, श्री. तुषार सोनवणे, श्री. उमाकांत पाटील इत्यादींनी उत्साहाने सहभाग नोंदवला. बासरी वादनाचे सुर ऐकून नागरिकांनी कौतुकाचा वर्षाव केला आणि या भावनिक क्षणाची आठवण मनात साठवली. मुख्याधिकारी साहेबांनी सर्वांना श्रावण सोमवारच्या शुभेच्छा देत कार्यक्रमाची सांगता ‘हर हर महादेव!’ च्या जयघोषात झाली.



No comments