कोतवाली पोलिसांची मोठी कारवाई..कुख्यात गुन्हेगारांकडून 4 बंदूक 34 जिवंत काडतूस हस्तगत..पोलिसांमुळे गंभीर गुन्हा टाळला सचिन मोकळं अहिल्यान...
कोतवाली पोलिसांची मोठी कारवाई..कुख्यात गुन्हेगारांकडून 4 बंदूक 34 जिवंत काडतूस हस्तगत..पोलिसांमुळे गंभीर गुन्हा टाळला
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.११):-घातपात करण्याच्या हेतूने अग्निशास्त्र घेऊन जात असताना दोन कुख्यात गुन्हेगारांना ४ अग्निशस्त्र,२ मॅग्झिन,३४ जिवंत काडतुस,3 मोबाईल फोन व १ लाल रंगाची स्विफ्ट चारचाकीसह पकडण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई दि.१० जुलै २०२५ रोजी क्लेरा ब्रुस, हायस्कुल ग्राऊंड येथे करण्यात आली आहे.रोहन राजु गाडे,वय ३० वर्षे,राअपर इंदिरानगर, बिबवेवाडी,पुणे, मुळ रा. गाडेवाडी,ता.मुळशी,जि.पुणे, नवनाथ अंकुश देणे,वय- २९ वर्षे, रा.घर नं. ३९८६, नवनाथ निवास, सुरभी कॉलनी रोड, आपटे सोसायटी,वारजे माळवाडी,ता. हवेली,जि.पुणे असे पकडलेले आरोपींची नावे आहेत.पो.हे.कॉ./१३८१ सलीम रमजान शेख यांचे फिर्यादीवरुन त्यांचे विरुध्द कोतवाली पोलीस स्टेशन, अहिल्यानगर गु.र.नं. ६४२/२०२५ भारतीय शस्त्र अधिनियम १९४९ चे कलम ३/२५, (१ B.) (a.) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक/कृष्णकुमार सेदवाड हे करित आहेत.सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक श्री. सोममाथ घार्गे,अपर पोलीस अधिक्षक श्री.वैभव कलुबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर शहर विभाग श्री.अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.प्रताप दराडे, पोसई/गणेश देशमुख,गुन्हे शोध पथकाचे पोसई/कृष्णकुमार सेदवाड,पोहेकॉ/बाळकृष्ण दौंड, विशाल दळवी,सलीम शेख, विनोद बोरगे,विक्रम वाघमारे, सुर्यकांत डाके,अभय कदम, सत्यजीत शिंदे,अमोल गाडे, अतुल काजळे,सोमनाथ केकाण, महेश पवार,शिरीष तरटे,सचिन लोळगे,दत्तात्रय कोतकर,प्रतिभा नागरे,दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडू यांनी केली आहे.
No comments