Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना आहारा करिता पुरवठा होत असलेल्या अन्नधान्य इ साहित्य पुरवठ्यात होत असलेल्या भ्रष्टाचारामुळे १ ऑगस्ट पासून दुसऱ्यांदा उपोषण.

  शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना आहारा करिता पुरवठा होत असलेल्या अन्नधान्य इ साहित्य  पुरवठ्यात होत असलेल्या भ्रष्टाचारामुळे १ ऑगस्ट पा...

 शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना आहारा करिता पुरवठा होत असलेल्या अन्नधान्य इ साहित्य  पुरवठ्यात होत असलेल्या भ्रष्टाचारामुळे १ ऑगस्ट पासून दुसऱ्यांदा उपोषण.


जळगाव प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना आहारा करिता पुरवठा होत असलेल्या अन्नधान्य, भाजीपाला, मटण, चिकन पुरवठ्यात झालेल्या व होत असलेल्या भ्रष्टाचारामुळे १ ऑगस्ट पासून दुसऱ्यांदा उपोषण.

     महाराष्ट्र आदिवासी वेल्फेअर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष साहिल तडवी यांनी आश्रमशाळेतील आहार पुरवठा भ्रष्टाचाराची चौकशी होणे करिता दिनांक १७ मार्च २०२५ रोजी प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालया समोर उपोषणास बसले होते तेव्हा प्रकल्प अधिकारी श्री अरुण पवार साहेबांनी उपोषण स्थळी येऊन उपोषणकर्ते साहिल तडवी यांच्याशी चर्चा केली व लेखी पत्र हि दिले होते त्या पत्रात त्यांनी  नमुद बाबींचा पुरवठा वरिष्ठ कार्यालयाचा आदेशान्वये या कार्यालया अंतर्गत असलेले शासकीय आश्रमशाळांना संबंधित बाबींचा पुरवठा सुरू आहे, त्या प्राप्त पुरवठा बाबत स्वयंस्पष्ट वस्तूस्थीती नुसार पोहोच पावती बाबतचा अहवाल या कार्यालयास सादर करण्यात यावे. या बाबत या कार्यालयाच्या स्तरावरून मुख्याध्यापक, अधिक्षक यांना ताकीद देण्यात येत आहे, तसेच संबंधित मुख्याध्यापक यांनी परस्पर पोहोच पावत्या मा. अपर आयुक्त आदिवासी विकास नाशिक, यांच्या कार्यालयास जमा केल्यास व त्या बाबत आपल्या तक्रारीच्या अनुषंगाने मा. आयुक्त आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य नाशिक यांना अवगत करण्यात येईल.

   तसेच मुख्याध्यापक स्तरावर कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार होणार नाही या बाबत दक्षता घेण्यात येत आहे, तरी आपणास विनंती करण्यात येते की, सदर आरंभिलेले उपोषण मागे घेण्यात यावे. असे प्रकल्प अधिकारी श्री अरुण पवार साहेब यांनी चर्चेत व लेखी आश्वासन दिले होते.

   परंतु माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार प्रकल्प अधिकारी श्री अरुण पवार साहेबांच्या लेखी पत्रान्वये कुठलीही कार्यवाही झालेली दिसुन आलेली नाही, मिळालेल्या माहितीनुसार असे दिसून आले की यावल प्रकल्पात वरिष्ठ कार्यालयाचा भाजीपाला, मटण, चिकन, केळी, अंडी पुरवठा आदेशाला उशीर होत असल्याने प्रकल्प अधिकारी श्री अरुण पवार साहेबांनी दिनांक २३/७/२०२४ रोजी च्या पत्रानुसार सर्व मुख्याध्यापक यांना त्यांच्या स्तरावर खरेदीचे अधिकार दिले होते, व दिनांक २६/६/२०२४ रोजी उच्च न्यायालयाने यावल प्रकल्पातील आश्रमशाळांना भाजीपाला, मटण, चिकन, व केळी पुरवठा आदेशाला स्थगिती दिली होती, अपर आयुक्त कार्यालय नाशिक यांचेकडून भाजीपाला व मटण चिकन पुरवठ्याचे दिनांक  आदेश डिसेंबर २०२४ मध्ये प्रकल्प कार्यालयास प्राप्त झाले होते, सदर आदेशावर १/७/२०२४ हि तारीख असल्याने काही मुख्याध्यापक अधिक्षक यांनी डिसेंबर मध्ये प्राप्त आदेश धारकांना जुलै २०२४ पासून च्या पोहोच पावत्या देऊन संगणमताने भ्रष्टाचार केलेला दिसून आला आहे,

   शासनाच्या आदेशानुसार एकवाक्यता सुसुत्रता राहण्यासाठी सर्व शाळांवर सारखीच भाजी व दररोज मेनुप्रमाणे आदलबदल भाजीपाला व महिन्यातून दोन वेळा शाळेवर जिवंत बोकड, कोंबडी आणून सर्व शाळेवर एकाच दिवशी एकाच वेळी मटण चिकन देऊन शासन नियमांचे पालन व्हावे, व विद्यार्थ्यांना केळी, अंडी दररोज दिली जावी, आश्रमशाळांमध्ये आहाराचा सर्व पुरवठा खाण्यासाठी योग्य आहे का या बाबत सर्व पदार्थ अन्न व औषध प्रशासना कडून वेळोवेळी तपासणी करून त्या बाबतचे प्रमाणात घेण्यात यावे,

   सदर तक्रारीची तात्काळ चौकशी होऊन झालेल्या भ्रष्टाचाराची वसुली करून संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करून झालेला पत्रव्यवहार व केलेल्या कार्यवाहीचा खुलासा तात्काळ कळावा अन्यथा परत दिनांक १ ऑगस्ट २०२५ पासून योग्य ती कायदेशीर कारवाई होईपर्यंत दुसऱ्यांदा उपोषणाचा इशारा महाराष्ट्र आदिवासी वेल्फेअर असोसिएशन चे जिल्हाध्यक्ष साहिल तडवी यांनी आज प्रकल्प अधिकारी श्री अरुण पवार साहेबांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे, सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदिवासी विकास मंत्री मा.ना.श्री. डॉ. अशोकजी उईके साहेब, मा. अध्यक्ष ,अनुसूचित जाती जमाती आयोग, मा. प्रधान सचिव आदिवासी विकास विभाग, मा. आयुक्त आदिवासी विकास विभाग, मा.अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग, मा. जिल्हाधिकारी जळगाव, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी फैजपूर, मा. पोलीस निरीक्षक यावल यांना सदर निवेदनाच्या प्रती हस्ते व ई-मेल ने देण्यात आल्या आहेत.

No comments