युवाशक्ती ग्रामविकास संगठन तर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन !! घरकुल लाभार्थ्यांना शासन निर्णयानुसार वाढीव 50/- हजार रुपये निधी उपलब्ध करून दे...
युवाशक्ती ग्रामविकास संगठन तर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन !!
घरकुल लाभार्थ्यांना शासन निर्णयानुसार वाढीव 50/- हजार रुपये निधी उपलब्ध करून देण्यासाठी विनंती !!
विकास पाटील धरणगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव : महाराष्ट्र सरकारने त्यांच्या हिश्यातुन पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल टप्पा-2 च्या लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या निधीत दि. 04 एप्रिल 2025 रोजी शासन निर्णय जारी करून 50/- हजार रुपयांची भरघोस वाढ जाहीर केली होती परंतु त्यांवर आजपर्यंत कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी होत नसल्याने अनेक लाभार्थी चिंतातूर होते, युवाशक्ती ग्रामविकास संगठन ही महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील कानाकोपऱ्यात ग्रामपंचायत संबंधित नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच त्यांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी अनेक वर्षांपासून कार्यरत आहे, संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या बाबतीत वेळोवेळी अनेक पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालय स्तरावर पाठपुरावा सुद्धा केलेला आहे, परंतु जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर प्रतिसाद मिळाला नसल्याने आता संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष श्री इमरान पठाण यांनी थेट मंत्रालयात जाऊन मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल टप्पा-2 च्या लाभार्थ्यांना वाढीव 50/- हजार नीधीचे त्वरित वितरण करण्यासाठी निवेदन दिले आहे. या निवेदनावर मुख्यमंत्री व मंत्रालयातर्फे काय निर्णय घेतल्या जाते याकडे ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
No comments