adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

लासूर येथे महात्मा ज्योतिबा फुले तसेच सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे अनावरण

 लासूर येथे महात्मा ज्योतिबा फुले तसेच सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे अनावरण लासूर ता.चोपडा(प्रतिनिधी)-  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ला...

 लासूर येथे महात्मा ज्योतिबा फुले तसेच सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे अनावरण



लासूर ता.चोपडा(प्रतिनिधी)- 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

लासूर -:- येथे श्री संत सावता महाराज पुण्यतिथी संजीवन सोहळा निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.पुण्यतिथीदिनी सकाळी श्री क्षत्रिय माळी समाज मंगल कार्यालयात महाराजांच्या प्रतिमेचे पूजन नवविवाहित जोडप्यांच्या हस्ते संपन्न झाले त्यानंतर सात दिवसीय किर्तनी सप्ताहाचा काल्याच्या कीर्तनाने समारोप झाला.दरम्यान ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचे देखील आयोजन याप्रसंगी करण्यात आले होते.डोळे तपासणी शिबिर,गुणवंत विद्यार्थी तसेच सेवानिवृत्त समाजबांधवांच्या गौरव सोहळा आदी विधायक कार्यक्रम देखील पुण्यतिथी सोहळ्याचे केंद्रबिंदू ठरले.

       संध्याकाळी बहुप्रतिक्षित महात्मा ज्योतिबा फुले तसेच सावित्रीबाई फुले यांच्या स्मारक अनावरण सोहळा छत्रपती शिवाजी महाराज चौकात पार पडला.स्मारकाचे अनावरण सरपंच नर्मदाबाई भिल,उपसरपंच अनिल पाटील,चोपडा सूतगिरणी संचालक अमृतराव वाघ, पोलीस पाटील जितेंद्र पाटील,माजी सरपंच जनाबाई माळी,माजी उपसरपंच अनिल वाघ,माळी समाज अध्यक्ष ए.के.गंभीर सर, एच एच माळी सर यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाप्रसंगी अमृतराव वाघ यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ए.के.गंभीर, सूत्रसंचलन जितेंद्र माळी तर आभार मंडळाचे सचिव सुरेश पवार यांनी मानले. श्री संत सावता महाराज यांची गावातून भजनाच्या तालावर वाजत गाजत शोभायात्रा काढण्यात आली.यावेळी सर्व संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ तसेच माळी समाज बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments