Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

तब्बल 77 लाखांचा गुटखा जप्त विशेष पोलीस पथकाची कारवाई

  तब्बल 77 लाखांचा गुटखा जप्त विशेष पोलीस पथकाची कारवाई  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर (दि८):- जिल्हा पोलीस ...

 तब्बल 77 लाखांचा गुटखा जप्त विशेष पोलीस पथकाची कारवाई 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि८):- जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांनी विशेष पथक तयार करुन अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करणे आदेश दिलेले आहेत.दिलेल्या आदेशाप्रमाणे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे हे दि.०८ जुलै २०२५ रोजी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस पथकासह पेट्रोलिंग करत माहिती घेत असताना त्यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, समृध्दी महामार्गावरील कोपरगावकडे जाणाऱ्या टोलनाक्याजवळ एक आयशर कंपनीचा टेम्पो त्यावर काळ्या रंगाची ताडपत्री असलेला  MH-४६-BB-८०१८ वाहनामध्ये काही इसम हे महाराष्ट्र राज्यात  प्रतिबंध असलेला शरीरास अपायकारक होईल असा खाद्य पदार्थ पान मसाला,गुटखा वाहतूक करणार आहेत,अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तात्काळ कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचा स्टाफ व अन्न व प्रशासन विभागाचे अधिकारी तसेच पंचांना छाप्यासाठी हजर रहा असे कळवून त्यांनी संमती दिल्यानंतर पोलीस पथक पंचांसह कारवाई करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह शासकीय व खाजगी वाहनाने रवाना झाले वरील नमूद ठीकाणी जाऊन पथकातील अधिकारी सापळा लाऊन थांबले असताना,थोड्याच वेळात समृध्दी महामार्गावरील कोपरगावकडे जाणाऱ्या टोलनाक्या जवळच एक आयशर  कंपनीचा राखाडी रंगाचा टेम्पो त्यावर काळ्या रंगाची ताडपत्री असलेला येताना दिसला तो येताच पोलीस पथकाने इशारा करून सदर टेम्पो रत्याच्या कडेला बांबून बातमितील नमूद माहिती प्रमाणे सदरची गाडी आयशर कंपनीचा टेम्पो MH-४६-BB-८०१८ हा असल्याची खात्री झाल्याने पंचासमक्ष सदर गाडीवरील चालकास ताब्यात घेऊन पोलीस पथक असल्याची माहिती देऊन विन्यासात घेवून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अकील रमजान शेख ४२ वर्ष भगतसिंग नगर ता.जि. आदिलाबाद ता.जि.आदिलाबाद राज्य-तेलंगणा हल्ली रा.कोदरी ता.मागांत यवतमाळ असे असल्याचे सांगितले.पंचासमक्ष सदर गाडीची झडती घेतली असता सदर गाडीमध्ये सुगंधीत तंबाखू व पानमसाला भरलेल्या गोण्या मिजून आल्या.पोलीस पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी पंचांसमक्ष अन्न व प्रशासन अधिकारी यांच्या समवेत वरील आरोपी च आयशर टेम्पो मध्ये मिळून आलेला मुद्देमाल ताब्यात घेऊन कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे आणून मुद्देमालाची तपासणी केली.पकडलेल्या आरोपीस विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदरचा माल हा मामू रोडलाईन ट्रॉन्सपोर्ट याचे व्यस्थापक (पूर्ण नाव माहित नाही) याचे मार्फतीने ताब्यात बाळगून घेवून जात असले बाबतचे सांगितले.सदर बाबत पोलीस पथक अन्न सुरक्षा अधिकारी श्री राजेश नामदेव बडे यांनी पंचांसमक्ष प्रतिबंधीत अन्न पदार्थाच्या साठ्यामधून प्रत्येकी एक एक सीलबंद पैकेट प्रयोगशाळेत कमी वेगवेगळे करुन बाकीचा मिळून आलेला मुद्देमाल सविस्तर पंचनामा करुन जप्त केला आहे.वरील प्रमाणे कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हहील महाराष्ट्र राज्यामध्ये गुटखा, पान मसाला, सुगंधी तंबाखु या प्रतिबंधीत अन्न पदार्थाची की, उत्पादन, वाहतूकीस बंदी आहे तसेच सदर अन्न पदार्षापासून वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर आजार उद्‌भावतात अशी बाब ज्ञात असूनही सात आर्थिक फायद्यासाठी प्रतिबंधीत अन्न पदार्याची विक्री साठा करन महाराष्ट्र शासन यांनी काढलेल्या आदेशाचे उल्लंघन करणारे ०१ आरोपी व मामू रोडलाईन ट्रॉन्सपोर्ट चाचे व्यवस्थापक (पूर्ण नाव माहित नाही) यांच्याविरुध्द अन्नसुरक्षा अधिकारी श्री राजेश नामदेव बड़े यांनी बोपरगाव शहर पोलीस स्टेशनाला फिर्याद देऊन खालीलप्रमाणे गुन्हा दाखल केल्या आहे.सदरची कामगिरी श्री.सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री. वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक विभाग,श्री.शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी शिडी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक विशेष पथकाचे प्रभारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री.संतोष खाडे, पोसई राजेंद्र वाघ,पोहेकॉ.शंकर चौधरी,अजय साठे,दिगंबर कारखिले,मल्लिकार्जुन बनकर,अरविंद भिगारदिवे,उमेश खेडकर,सुनिल पवार,दिनेश मोरे,सुनिल दिघे,अमोल कांबळे,संभाजी बोराडे,विजय ढाकणे,दिपक जाधव,जालिंदर दहिफळे यांचे पथकाने केली आहे.

No comments