Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

घनकचरा व्यवस्थापनाकडे कचरा उचलण्याची मागणी

  घनकचरा व्यवस्थापनाकडे कचरा उचलण्याची मागणी  श्रीरामपूर / प्रतिनिधी:  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) येथील वॉर्ड क्र.२ मधील पाटाच्या कडेस ...

 घनकचरा व्यवस्थापनाकडे कचरा उचलण्याची मागणी 


श्रीरामपूर / प्रतिनिधी: 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

येथील वॉर्ड क्र.२ मधील पाटाच्या कडेस "वैदूवाडा पुल ते दाळवाले चाळ पर्यंत" नगर पालिका प्रशासनाने सिमेंट क्रॉंकिटचा रस्ता बनवला याबाबत नगर पालिका प्रशासनास धन्यवाद. 

मात्र याठिकाणी पाटाच्या कडेला जो कचरा टाकला जातो यामुळे परिसरात दुर्गंधी तर पसरतेच शिवाय या कचऱ्यामुळे मोकाट कुत्रे आणी डुकरे यांनी अक्षरशः धुमाकूळ माजवला आहे,

तसेच या रस्त्यावर शालेय विद्यार्थी, महिला, मुले, वयोवृद्ध यांच्या ये जा ची मोठी वर्दळ असल्याने तथा याठिकाणी पाटाच्या कडेला असलेल्या वाढलेले गवत आणी अनावश्यक झाडा झुडपात डुकरे दिवसभर लपून बसलेली असतात, कोणी कचरा टाकल्यास त्यावर ताव मारण्यासाठी कुत्रे व डुकरे कचऱ्यावर तुटून पडतात, कधी काळी नागरीकांच्या अंगावर धावूनही येतात यामुळे भविष्यात काही अप्रिय घटना घडण्याची शक्यता ही नाकारता येत नाही,तसेच सदरील कचरा हा काही वेळा पाटाच्या पाण्यात जातो आहे तर काही वेळा रस्त्यावर येत असल्याने रस्त्यावरुन ये - जा करणाऱ्या नागरीकांना दुर्गंधीसोबतच मोठ्या त्रासाचा सामना करणे भाग पडत आहे. करीता घनकचरा व्यवस्थापन विभागाने दररोजच सदरील ठिकाणचा कचरा उचलत जावा यासोबतच सदरील ठिकाणचे गवत व अनावश्यक झाडे झुडपे काढणेकामी नगर पालिका प्रशासनाने पुढाकार घ्यावा, ज्यामुळे परिसरातील नागरीकांच्या समस्या दुर होवू शकतील अशी परिसरातील नागरीकांकडून मागणी केली जात आहे.

वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर - 9561174111

No comments