विद्यार्थ्यांच्या खून प्रकरणी सीताराम सारडा विद्यालयातील मुख्याध्यापक यांना निलंबित करून शिक्षक,कर्मचारी यांच्यावर कठोर कार्यवाई करा...रिप...
विद्यार्थ्यांच्या खून प्रकरणी सीताराम सारडा विद्यालयातील मुख्याध्यापक यांना निलंबित करून शिक्षक,कर्मचारी यांच्यावर कठोर कार्यवाई करा...रिपब्लिकन सेनेचे माध्यमिक शिक्षण विभागाला निवेदन
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.३०):- शहरातील हिंद सेवा मंडळ संचलित सीताराम सारडा विद्यालयातील मुख्याध्यापकांना निलंबित करून या विद्यालयातील शिक्षक,व इतर कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हापरिषद अहिल्यानगर यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.या बाबतची माहिती अशी की बुधवार दि. 18 जून रोजी शाळेच्या वेळेत दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास सर्जेपुरा भागातील दोन मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांमध्ये पूर्वीच्या किरकोळ वादातून भांडण झाले,त्या वादाचे पुनवर्सन म्हणजे आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विदयार्थ्याच्या पोटावर,छातीवर चाकूने वार करून खून केला. ही बाब निश्चितच हदरवून सोडणारी आहे.याबाबत निवेदनच्या माध्यमातून शाळेच्या वेळेत अशी घटना घडली कशी? तसेच विदयार्थ्याकडे चाकू आला कसा? शाळेत सुरक्षा रक्षक आहेत की नाहीत? शिक्षकांचा विदयार्थ्यांवर अंकुश आहे, की नाही? शाळेच्या आवारात खून होत असून या घटनेची जबाबदारी संस्था व शालेय व्यवस्थापनाची नाही का? असे प्रश्न निवेदनातून उपस्थित केले आहेत. सीताराम सारडा विद्यालयात लालटाकी, सिद्धार्थ नगर, निलक्रांती चौक, कोठला, मंगलगेट, सर्जेपुरा, आदी भागातील बहुजन समाजातील गोरगरीब विध्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांमुळेच शाळेची पट संख्या टिकून आहे. मग फक्त पट संख्या टिकवून ठेवण्या इतपतच शाळेची जबाबदारी आहे का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. या खून प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकाचे त्वरित निलंबन करून सर्व शिक्षक व इतर कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. लवकरात लवकर कारवाई न झाल्यास माध्यमिक शिक्षण विभागच्या दालनात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर जिल्हा अध्यक्ष सुनील शिंदे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पत्रकार महेश भोसले, जिल्हा उपाध्यक्ष विकास रणदिवे, जिल्हा संरक्षण प्रमुख संजय ताकवले, शहर उपाध्यक्ष विवेक विधाते यांच्या सह्या आहेत.
No comments