यशस्वी आधार कार्ड कॅम्प – यंग नेटवर्क फाउंडेशन नायगांव भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यंग नेटवर्क फाउंडेशन मार्फ...
यशस्वी आधार कार्ड कॅम्प – यंग नेटवर्क फाउंडेशन नायगांव
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यंग नेटवर्क फाउंडेशन मार्फत पेसा कायदा (PESA Act) अंतर्गत येणाऱ्या आदिवासी भागांमध्ये आधार कार्ड कॅम्पचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश दुर्गम आणि तांत्रिकदृष्ट्या दुर्बल भागांतील नागरिकांना महत्त्वाची ओळखपत्र सेवा उपलब्ध करून देणे हा होता. या कॅम्पमध्ये नागरिकांना नवीन आधार नोंदणी, दुरुस्ती, आणि अपडेट यांसारख्या सेवा पुरवण्यात आल्या.
गावाचे नाव मालोद, वाघझीरा, चिपखेडा. दिनांक: 24, 26, 27, 28 जून 2025 लाभार्थी संख्या: 581 या उपक्रमामध्ये स्थानिक ग्रामपंचायत, स्वयंसेवक, याचा मोलाचा सहभाग होता. यंग नेटवर्क फाउंडेशनने पुन्हा एकदा सामाजिक न्याय आणि डिजिटल समावेश साध्य करण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल उचलले आहे.
No comments