adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अतिक्रमण काढू नये केदार सानप यांची मुख्याधिकार्‍यांना विनंती

  अतिक्रमण काढू नये केदार सानप यांची मुख्याधिकार्‍यांना विनंती भुसावळ प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) भुसावळ - शहरातील आठवडे बाजाराती...

 अतिक्रमण काढू नये केदार सानप यांची मुख्याधिकार्‍यांना विनंती


भुसावळ प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

भुसावळ - शहरातील आठवडे बाजारातील जैन मंदिराजवळ अतिक्रमण काढणार असल्याची माहिती नगरपालिकेच्या दवंडी मार्फत मिळाली. या संदर्भात मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांना समक्ष अतिक्रमण काढण्याठिकाणी भेटून सदरील विनंती निवेदन सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी दिले.

 श्री.सानप यांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्य निवेदनात म्हटले आहे की, पत्र क्र.संकिर्ण 2021/प्र.क्र.2008/नवि-20 दिनांक 29 जून 2021 या पत्रान्वये 1 जून पासून ते 30 सप्टेंबर पर्यंतच्या कालावधीत दरवर्षी पावसाळ्यात अनधिकृत झोपड्या किंवा अनधिकृत बांधकाम  काढू नये असे नमुद असतांना सदरील अतिक्रमण भुसावळ मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी काढलेले आहे. तरी  हे अतिक्रमण काढू नये अशी विनंती सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदार सानप यांनी केली आहे. तसेच ही कारवाई न थांबल्यास आपल्या विरूध्द उच्च न्यायालयात  जनहित याचिका दाखल करण्यात येईल व होणार्‍या परिणामास आपण जबाबदार राहाल यांची नोंद घ्यावी व याबाबत झालेल्या कारवाईची एक प्रत माहितीस्तव मला देण्यात यावी, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

No comments