पाल वासियांनी मोहर्रम व गुरुपौर्णिमा सणांच्या पार्श्वभूमीवर एकात्मता सलोखा अबाधित राखावा - डॉ विशाल जयस्वाल पाल येथे शांतता समितीच्या बै...
पाल वासियांनी मोहर्रम व गुरुपौर्णिमा सणांच्या पार्श्वभूमीवर एकात्मता सलोखा अबाधित राखावा - डॉ विशाल जयस्वाल
पाल येथे शांतता समितीच्या बैठकीत केले आवाहन
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पाल तालुका रावेर येथे मुस्लिम समाजाच्या मोहर्रम तसेच हिंदू समाज बांधवांच्या आषाढी एकादशी निमित्ताने गुरुपौर्णिमा सणांच्या पार्श्वभूमीवर रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पोलिस निरीक्षक विशाल जैस्वाल यांनी
गुरुपौर्णिमा व मोहरम या सणांच्या पार्श्वभूमीवर गावात जातीय एकात्मता सलोखा अबाधित व टिकवून राखण्यासाठी तसेच कायदा सुव्यवस्थेसह गावात शांतता राखण्याचे आवाहन केले गुरुपौर्णिमा दिनी भक्तगणांचा भला मोठा जनसमुदाय जमला जाईल यामुळे वाहतूकीची कोंडी होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच वाहनांमुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होणार नाही त्याकरिता दुचाकी चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी असेही ते म्हणाले यादरम्यान
पाल वासिय उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. यावेळी उपस्थितांनी पोलीस प्रशासन व सर्वधर्मसमभाव
समन्वयाच्या माध्यमातून गावात सौहार्दपूर्ण वातावरण टिकून राहील या विश्वासाने आस्वासित केले या आयोजित आढावा बैठकीत धनसिंग पवार, गोमती बारेला, कामील तडवी, भीमसिंग चव्हाण, हरी चव्हाण, अभिराम पवार, रघुनाथ चव्हाण, उत्तम पवार, प्रदीप जाधव, राधेश्याम पवार, मोहम्मद कुरेशी, सत्तार तडवी, भुरेखा तडवी, सुरेश पवार, मनिष चव्हाण, गणेश भाई, संतोष राठोड, मनिष बाविस्कर, नुकतेच बदली होऊन आलेले पोलीस उपनिरीक्षक राठोड पो. कॉ. जगदीश पाटील, ईश्वर चव्हाण, इस्माईल तडवी, शाबिर तडवी, अखिलेश बुनकर, दिलीप राठोड आदींचा समावेश होता. बैठकीस गावातील सर्वधर्मीय मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व पोलिस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments