Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

राज्य महिला आयोग आपल्या दारी, महिलांच्या तक्रारीच्या अनुषंगाने नेहमीच प्रयत्नशील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपाली चाकणकर..!!

  राज्य महिला आयोग आपल्या दारी,  महिलांच्या तक्रारीच्या अनुषंगाने नेहमीच प्रयत्नशील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपाली चाकणकर..!!  स...

 राज्य महिला आयोग आपल्या दारी,  महिलांच्या तक्रारीच्या अनुषंगाने नेहमीच प्रयत्नशील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपाली चाकणकर..!! 


सौ. अनुजा कारखेले ( पुणे जिल्हा ) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 राज्य महिला आयोग आपल्या दारी, या उपक्रमांच्या माध्यमांतून संपूर्ण महाराष्ट्रांच्या कानाकोपऱ्यात आणि महिलांच्या तक्रारीच्या अनुषंगाने राज्य महिला आयोगांच्या अध्यक्षा सौ. रूपाली चाकणकर नेहमीच प्रयत्नशील दिसून येतात. पक्षाबरोबरच महिलांची ठाम बाजू आक्रमक मांडणाऱ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सौ. रूपाली चाकणकर महिलांच्या तक्रारीच्या अनुषंगाने त्या सदैव नेहमीच प्रयत्नशील असतात डॅशिंग आणि खंबीर नेतृत्व असणाऱ्या रूपाली चाकणकरांचा कार्यकाळ संपूनही त्यांच्या कामाची दखल घेवुन त्यांना राज्य महिला आयोगांच्या अध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती देण्यात आली होती. पुणे जिल्ह्यातील दौंडमधील एका शेतकरी कुटुंबात रूपाली चाकणकरांचा जन्म झाला. रयत शिक्षण संस्थेतील साधना महाविद्यालयात त्यांचे शिक्षण पूर्ण झाले होते. विरोधकांच्या हल्ल्याला सडेतोडपणे आक्रमकपणे, उत्तर देणाऱ्या प्रत्येक विषयाची मुद्देसूद मांडणी करणाऱ्या अशी रूपाली चाकणकरांची ओळख आहे. सौ. रूपाली निलेशराव चाकणकर यांना पुढील तीन वर्षाच्या कार्यकाळ वाढवून देण्याचा निर्णय राज्य सरकारने देखील घेतला आहे. त्या जवळपास 2021 पासून अध्यक्षपदी पदावर विराजमान होत्या. खरंतर रूपाली चाकणकरांना अधिकारी होण्याची इच्छा असल्यामुळे विविध स्पर्धा परीक्षेचा अभ्यासही त्यांनी केला होता. पण त्यांना त्यात फारसं यश मिळलं नाही पुढे लग्नानंतर त्या चाकणकर कुटुंबात आल्या सौ.रूपाली निलेशराव चाकणकर यांना माहेरची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही, पण चाकणकर कुटुंबात राजकीय पार्श्वभूमी होती. सौ. रूपाली चाकणकरांच्या सासूबाई रुक्मिणी चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका होत्या त्यांच्या माध्यमांतून सौ.रूपाली निलेश चाकणकर यांचा राजकारणाशी संबंध येऊ लागला. 2002 पासून पुढची 5-6 वर्ष त्यांनी बचतगटासाठी काम केले, त्यानंतर चाकणकर यांना खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्षपद मिळालं तिथून सौ. रूपाली चाकणकरांचा राजकीय प्रवासाची सुरुवात झाली. महिलांच्या तक्रारीच्या अनुषंगाने विविध जिल्ह्यात जावुन राज्य महिला आयोग आपल्या दारी, हा उपक्रम राबवून महिलांच्या तक्रारी निवरण करून त्यांना योग्य तो न्याय राज्य महिला आयोग  नेहमीच देत असतं त्यामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या महिलांच्या तक्रारीच्या अनुषंगाने नेहमीच प्रयत्नशील, दिसून येतात.

No comments