लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती समिती अध्यक्ष पदी लहू सूर्यवंशी.. लातूर जि.प्र.(उत्तम माने) (संपादक -:- हेमकांत गायकवाड) निलंगा,(दि.०६)शहर...
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती समिती अध्यक्ष पदी लहू सूर्यवंशी..
लातूर जि.प्र.(उत्तम माने)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
निलंगा,(दि.०६)शहरातील मुक्ता साळवे नगर भागातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी क्रांतिवीर लहुजी सेना मराठवाडा अध्यक्ष गोविंद सूर्यवंशी हे होते. यावेळी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष लहू सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली.
या निमित्ताने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये वृक्षरोपण, रक्तदान शिबीर, अन्नदान,गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य अशा विविध सामाजिक उपक्रमाने जयंती साजरी होणार आहे. बैठकीमध्ये सर्वानुमते अध्यक्षपदी लहू लखन सूर्यवंशी उपाध्यक्षपदी विकास पवार
सचिवपदी विशाल कांबळे, कोषाध्यक्षपदी लक्ष्मण कांबळे, सहकोश्याध्यक्षपदी अजय कांबळे, संघटकपदी विशाल कांबळे, व्यवस्थापकपदी विजय काळे, तर सदस्यपदी गणेश कांबळे, अजय कांबळे, अंकुश सूर्यवंशी, निखिल पवार, सूरज जाधव, अमिती सूर्यवंशी, ओमकार कांबळे आदींची निवड करण्यात आली.
No comments