adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

क.जे.सोमैया हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयास सर्वतोपरी सहकार्य करणार - नामदार राधाकृष्ण विखे पाटील

  क.जे.सोमैया हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयास सर्वतोपरी सहकार्य करणार - नामदार राधाकृष्ण विखे पाटील श्रीरामपूर - महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा...

 क.जे.सोमैया हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयास सर्वतोपरी सहकार्य करणार - नामदार राधाकृष्ण विखे पाटील

श्रीरामपूर - महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना क. जे. सोमैया हायस्कूल यांच्यावतीने क्रीडांगण विकास निधी मधून स्वच्छतागृहासाठी निधी मिळावा या आशयाचे निवेदन देताना चेअरमन रणजीत श्रीगोड, पत्रकार व शालेय समिती सदस्य प्रकाश कुलथे, किशोर फुणगे, मुख्याध्यापक भूषण गोपाळे सर आदि.


श्रीरामपूर / प्रतिनिधी:

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

हिंद सेवा मंडळाच्या क.जे. सोमैया हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालच्या भौतिक, शैक्षणिक विकासासाठी अहिल्यानगर चे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देऊन विकास बाबत सविस्तर चर्चा झाली. विद्यालयाचे चेअरमन रणजित श्रीगोड,शालेय समिती सदस्य प्रकाश कुलथे, किशोर फुणगे, मुख्याध्यापक भूषण गोपाळे, उत्तर भाजपा अध्यक्ष नितिन दिनकर,शहर भाजपा अध्यक्ष जितेंद्र छाजेड माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, माजी जिल्हा परिषद सदस्य शरदराव नवले, अभिषेक पाटील खंडागळे, के. के आव्हाड यांचे सह आदि मान्यवर उपस्थित होते . या प्रसंगी ना. विखे पाटील यांनी हिंद सेवा मंडळाचे शैक्षणिक विकासासाठी जिल्ह्यात नावलौकीक आहे . या संस्थेचे अनेक माजी विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी तसेच विविध पदावर कार्यरत आहे.

क.जे.सोमैया हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शैक्षणिक,भौतिक विकास तसेच विद्यालयाच्या स्वच्छता गृह, महाविद्यालयासाठी

परिसर सुशोभिकरण करण्यासाठी निधी कमी पडणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले.

वृत्त विशेष सहयोग

अशोकराव खैरे (सर) श्रीरामपूर 

वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर - 9561174111

No comments