adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

एरंडोल पोलीस स्टेशन तर्फे गुरुगौरव सोहळा संपन्न. गुरुपौर्णिमेनिमित्त शहर व तालुक्यातील प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षकांचा सत्कार संपन्न.

  एरंडोल पोलीस स्टेशन तर्फे गुरुगौरव सोहळा संपन्न. गुरुपौर्णिमेनिमित्त शहर व तालुक्यातील प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षकांचा सत्कार संपन्न....

 एरंडोल पोलीस स्टेशन तर्फे गुरुगौरव सोहळा संपन्न.

गुरुपौर्णिमेनिमित्त शहर व तालुक्यातील प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षकांचा सत्कार संपन्न. 


प्रा. सुधीर महाले प्रतिनिधी 

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

 एरंडोल येथील -:- दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय येथे एरंडोल पोलीस स्टेशन तर्फे गुरुगौरव  सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष एरंडोल येथील प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड हे होते.तसेच प्रमुखातिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल जे.पाटील  उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक प्रसंगी बोलताना एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त उपस्थित शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.

अध्यक्षीय समारोपण भाषणात बोलताना एरंडोल विभागाचे प्रांताधिकारी मा.श्री.मनीषकुमार गायकवाड म्हणाले की , आमची पार्श्वभूमी सुद्धा शैक्षणिक वातावरणातीलच आहे माझे वडील मुख्याध्यापक होते. म्हणून "गुरुविना न मिळ ज्ञान, ज्ञानाविना न होई जगी सन्मान, जीवन भवसागर तराया चला वंदू गुरुराया" आशा मार्मिक शब्दात त्यांनी सर्व  गुरूंना शुभेच्छा दिल्या. 

   यावेळी खडके सिम येथील मुख्याध्यापक आर. टी. पाटील,एरंडोल येथील उन्नती विद्यालयातील मुख्याध्यापिका अंजुषा विसपुते, एरंडोल येथील आर.टी. काबरे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका काबरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सुद्धा यावेळी व्यासपीठावरून आपल्या मनोगतपर भाषणातून सर्वांना शुभेच्छा दिल्या. उपस्थितांमध्ये महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ.अरविंद बडगुजर, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ.रामा वानखेडे,  प्रा.डॉ.बालाजी पवार,माजी उपप्राचार्य प्रा.आर.एस. पाटील,प्रा. विजय वाघ तसेच तालुका व शहरातील शिक्षक तसेच पोलीस कर्मचारी, महाविद्यालयातील प्राध्यापक व  शिक्षकेतर कर्मचारी  उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.नरेंद्र गायकवाड यांनी केले.

कार्यक्रमाचे आभार एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस कॉ.  अनिल पाटील यांनी मानले.

No comments