शहराला काळीमा फासणारी घटना लैंगिक शोषण प्रकरणी निलंबन.... ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक निलंबित चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हे...
शहराला काळीमा फासणारी घटना लैंगिक शोषण प्रकरणी निलंबन....
ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक निलंबित
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा :- २२ जुलै रोजी चोपडा तालुक्यातील वराड येथील एका आदिवासी समाजातील प्रेमीयुगुल हे प्रेम विवाह करण्यासाठी पळून गेले असता मुलीचे आई-वडीलांनी आपल्या मुलीला पळवण्यामागे गावातीलच रहिवासी यांचेवर संशय व्यक्त केला होता यामुळे रहिवासी सुषमा दिलीप भिल्ल, विलास सुकलाल भिल्ल, इंदर मुन्ना भिल्ल, गोविंदा उखा भिल्ल यांना दुपारी एक वाजेच्या सुमारास चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले होते व त्यांना पोलीस उपनिरीक्षक नार्हेडा यांनी तुमच्या गावातील तुमच्या समाजातील जो मुलगा मुलीला घेऊन पळाला आहे. याप्रकरणात तुमचा हात असल्याचे सांगितले परंतु या घटनेशी आमचा तिळमात्र सबंध नाही. असे सांगितले म्हणून त्याचा राग नार्हेडा या पोलीस उपनिरीक्षक यांना आला व त्यांनी चारही लोकांना पट्ट्याने बेदम मारहाण करून त्यातील तीन तरूणांना अंगावरील कपडे काढण्यास प्ररावृत केले. हे पोलीस उपनिरीक्षक महाशय एवढ्यावर न थांबता त्यांनी चक्क त्यांना नागडे करून अनैसर्गिक कृत्य व मानवी मनास लज्जा उत्पन्न होईल व मानवी मनास हा एवढा किड्सवाना घाणेरडा प्रकार चोपडा ग्रामीण पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या लक्षात आला त्यांनी कुठल्याही प्रकारचा विलंब न करता पोलीस उपनिरीक्षक नार्हेडा यांना तडकाफडकी निलंबित करण्याची शिफारस जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांच्या कडे पाठवली. परंतु हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर आदिवासी समाजातील पुढाऱ्यांनी या प्रकरणाला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांच्या कडे निलंबित करण्यात आलेले पोलीस उपनिरीक्षक नार्हेडा यांच्या वर रितसर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी केली आहे
प्रतिक्रिया
आण्णासाहेब घोलप,चोपड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी भाग चोपडा
यांना या बाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की,संबंधित निलंबित पोलीस उपनिरीक्षक साजन नार्हेडा यांची विभागीय चौकशी सुरू असून चौकशी दरम्यान जे काही निष्पन्न निघेल त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगितले...

No comments