सावदा नगरपालिकेला लावले कुलूप, मूलभूत सुविधांच्या अभावाने नागरिक संतप्त;तीव्र आंदोलनाचा इशारा रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हे...
सावदा नगरपालिकेला लावले कुलूप,मूलभूत सुविधांच्या अभावाने नागरिक संतप्त;तीव्र आंदोलनाचा इशारा
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील सावदा येथील सोमेश्वर नगर कॉलनीतील रहिवाशांनी मंगळवारी सावदा नगरपालिकेवर मोर्चा काढून मूलभूत सुविधांच्या अभावाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. चिखलमय रस्ते, अपुरी गटार व्यवस्था, पथदिव्यांचा अभाव, अस्वच्छता आणि सर्पदंशाच्या वाढत्या घटनांमुळे त्रस्त नागरिकांनी नगरपालिकेच्या कार्यालयाला कुलूप ठोकले आणि मागण्या पूर्ण न झाल्यास कार्यालय उघडू न देण्याचा इशारा दिला.
गेल्या १५ वर्षांपासून वसाहत वाढत असलेल्या या भागात दोन वर्षांपासून नगरपालिकेच्या हद्दीत समावेश झाला आहे. कर वसुली होत असली, तरी रस्ते, गटारी, पथदिवे आणि स्वच्छता यासारख्या सुविधांचा अभाव आहे. गटारीतील पाणी रस्त्यांवर साचल्याने डास आणि साथीच्या रोगांचा धोका वाढला आहे. कार्यालय अधीक्षक प्रमोद चौधरी यांना निवेदन सादर करत तातडीने उपाययोजनांची मागणी केली.
नागरिकांनी एक तास ठिय्या आंदोलन करून कार्यालयाचे कुलूप उघडले, पण मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांनी मुख्याधिकारी भूषण वर्मा यांच्याशी चर्चा करून समस्यांची पाहणी करण्याचे आश्वासन दिले. चौधरी यांनी पथदिव्यांसाठी एमएसईबीकडे डिमांड नोट भरण्याची कार्यवाही आणि रस्त्यांसाठी मुरूम टाकण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. मात्र, यापूर्वीच्या आश्वासनांवर कार्यवाही न झाल्याने नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास उडाला आहे.
रस्त्यांची दुरुस्ती आणि खड्डे भरणेगटारांची स्वच्छता आणि पाण्याचा निचरापथदिव्यांची व्यवस्थापरिसरात नियमित स्वच्छता नागरिकांनी स्पष्ट केले, “आम्ही कर भरतो, पण सुविधा मिळत नाहीत. मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करू.” मुख्याधिकारी भूषण वर्मा यांच्याकडून तातडीने पाहणी आणि उपाययोजनांची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.


No comments