भीम आर्मी चे भारत बंद आंदोलन अनेक संघटना सहभागी रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रा...
भीम आर्मी चे भारत बंद आंदोलन अनेक संघटना सहभागी
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा, राष्ट्रीय मुस्लीम मोर्चा, भारतीय युवा मोर्चा यांच्या माध्यमांतून मा. वामन मेश्राम साहेब( राष्ट्रीय अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा) व चौधरी विकास पटेल ( राष्ट्रीय अध्यक्ष रा. पि. मो ) यांच्या नेतृत्वात संपूर्ण देशभर १ जुलै रोजी भारत बंद हे आंदोलन पुकारण्यात आले त्याच्याच एक भाग म्हणून जळगाव जिल्हात २० सेंटर वरती हे आंदोलन करण्यात आले त्यापैकी एक सेंटर यावल तालुक्यातील फैजपूर शहर येथे कळकळीत बंद करण्यात आले . या तालुक्यात भारत बंद या आंदोलनाचे नेतृत्व मा.ज्ञानदेव भालेराव ( भारत मुक्ती मोर्चा ) तालुका अध्यक्ष व भारतीय युवा मोर्चा चे तालुका अध्यक्ष प्रद्युम्न वारडे यांनी केले .या आंदोलनाला यशस्वी करण्या साठी विविध सामाजिक व राजनैतिक संगठनांनी सहभागी होऊन पाठिंबा दिला .
यात . १ महिला अन्याय आत्याचार विरोधी समिती ( म . राज्य )
२) निळे निशाण समाजिक संगठन
३ तडवी आदिवाशी सेवा मंडळ
४ भीम आर्मी भारत एकता मिशन
५ भिमशक्ती मित्र मंडळ फैजपूर हे सहभागी होते .
खालील मुद्दयांना घेऊन हे आदोलन यशस्वी करण्यात आले .
1) EVM मशीन बंद करुण निवडनुका हया बैलेट पेपर वर घेण्यात याव्या
2) केंद्र सरकार द्वारा OBC ची जातणिहाय जनगणना न कारण्याच्या विरोधात
3) अमित शाह द्वारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपमान जनक शब्द वापरल्याच्या विरोधात
4) बोधगया महाविहार मुक्ति साठी व १९४९ चा BT एक्ट विरोधात
5) वफ्फ संशोधन कायदा रद्द करन्यात यावा या साठी
6)आदिवासी समाजावर होणारे अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये 7)शेतकऱ्या च्या शेतमालाला हमीभाव न देण्याच्या विरोधात 8)जुनी पेंशन लागू न करण्याच्या विरोधात 9) सरकारी क्षेत्राचे होत असलेल्या खाजगी कारनाच्या विरोधात


No comments