गोरगावलेच्या ऋग्वेद पाटीलची ऑल इंडिया सीबीएसई योगासन क्रीडास्पर्धेत सुवर्णभरारी.. चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा (दि.२९...
गोरगावलेच्या ऋग्वेद पाटीलची ऑल इंडिया सीबीएसई योगासन क्रीडास्पर्धेत सुवर्णभरारी..
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा (दि.२९):- तालुक्यातील गोरगावले बु. येथील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी स्व.लक्ष्मण आनंदा पाटील यांचा नातू ऋग्वेद प्रदीप पाटील याने ग्रीन फिंगर्स ग्लोबल स्कूल खारघर नवी मुंबई येथे दि.२१ ते २५ जुलै दरम्यान आयोजित ऑल इंडिया सीबीएसई साऊथ झोन योगासन स्पर्धेत १७ वर्षे वयोगट अंतर्गत सुवर्णपदक पटकवले आहे. ऋग्वेद हा ध्रुव ग्लोबल स्कूल संगमनेर जि.अहमदनगर या शाळेचा विद्यार्थी असून लहानपणापासूनच त्याला वेगवेगळ्या खेळात आवड होती. त्याचे नाव शाळेत दाखल झाल्यावर त्याच्या वर्ग शिक्षकांनी त्याच्यातील अंगभूत कलागुणांची चाचपणी केली असता तो चांगल्या प्रकारे योगासन करू शकतो, असे त्याच्या पालकांना सांगितल्यावर त्यांनीही त्याचे क्लासेस लावलेत. कमी वेळात ऋग्वेदने योगासन प्रकारात शाळेचे नाव उज्ज्वल केले. त्याने नुकत्याच १७ व १८ जुलै रोजी अहमदनगर जिल्हास्तरीय योग स्पर्धेत दोन सिल्वर मेडलही मिळवलेले आहेत. पुढील काळात होणाऱ्या खेलो इंडिया खेलो या स्पर्धेत त्याचे नामांकन झालेले असून गुजर समाजातून प्रथमच योगासन स्पर्धेत जाणारा विद्यार्थी म्हणून त्याचे नावलौकिक व गौरव होत आहे.
याआधीही त्याने नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टेडियम मध्ये २१ देशातील योग साधकांनी सहभाग घेतलेल्या दुसऱ्या आशियाई योगसाधना चॅम्पियनशिपमध्ये योग प्रकार सादर करून विशेष प्राविण्य मिळवलेले होते. त्याच्या ह्या उत्तुंग यशाबद्दल योगगुरू स्वामी रामदेवजी बाबा, ग्लोबल योग आयकॉन डॉ.मनसुख मांडवीया, भारत सरकार क्रीडा विभाग युवा कार्यमंत्री श्रीमती. रक्षाताई खडसे, सौ.सुजाता चतुर्वेदी, सचिव साध्वी देव प्रियाजी, पतंजली विद्यापीठ डिन विश्वास मंडलिक गुरुजी, प्रथम पंतप्रधान योग पुरस्कार विजेते डॉ.जयदीप आर्य, विश्व योग महासंघाचे अध्यक्ष डॉ. उदित शेठ, योगासन इंडियाचे अध्यक्ष डॉ.उमंग डॉन, आशियाई योग साधना विभागाचे सरचिटणीस गजेंद्रसिंह शेखावत यांच्या प्रमुख उपस्थितीत त्याला सन्मानित करण्यात आले आहे.
No comments