डावललेल्या मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करा.... शिवसेनेचे भरत चौधरी सर. भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) नु...
डावललेल्या मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करा.... शिवसेनेचे भरत चौधरी सर.
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
नुकत्याच होऊ घातलेल्या पीक संरक्षण सोसायटी, चुंचाळे तालुका यावल ज्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दुय्यम सहाय्यक निबंधक कार्यालय यावल यांचे माध्यमातून पीक संरक्षण सोसायटी, चुंचाळे साठी तात्पुरती मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. या प्रसिद्ध झालेल्या मतदान यादी मध्ये पूर्वीपासून सभासद असलेले बऱ्याच मतदारांना डावलण्यात आले असून त्यांची नावे या मतदार यादीतून वगळण्यात आल्याचे आढळून येते ज्या मतदारांची नावे मतदान यादीमध्ये समाविष्ट झालेली नाही असे मतदार नाराज असून त्यांची नावे मतदान यादी समाविष्ट व्हावी व त्यांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी शिवसेनेचे भरत चौधरी सर व राजू सोनवणे यांनी दुय्यम सहाय्यक निबंधक अच्युत भाग नगरे साहेब यांच्याकडे लेखी निवेदनाच्या स्वरूपात मतदान यादीवर हरकत घेऊन त्या डावलल्या गेलेल्या मतदारांची नावे मतदान यादी समाविष्ट करावी व त्यांना मतदानाचा अधिकारापासून वंचित राहू नये म्हणून प्रत्यक्ष अधिकाऱ्यांशी चर्चा करून या संदर्भात लेखी स्वरुपात निवेदन देण्यात आले आहे या मतदार यादी मध्ये झालेल्या या नियमबाह्य प्रकारामुळे बरेच मतदार नाराज असल्याने त्यांच्या माध्यमातून शिवसेनेचे भरत चौधरी सर यांनी दुय्यम सहाय्यक निबंधक यांच्याकडे निवेदन सादर केले व चर्चा केली
No comments