‘एक पेड,मा के नाम’ माजी उपनगराध्यक्ष छाया दाभाडे यांचा स्तुत्य उपक्रम. प्रा. सुधीर महाले प्रतिनिधी - (संपादक -:- हेमकांत गायकवाड) एरंडोल य...
‘एक पेड,मा के नाम’ माजी उपनगराध्यक्ष छाया दाभाडे यांचा स्तुत्य उपक्रम.
प्रा. सुधीर महाले प्रतिनिधी -
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
एरंडोल येथील सामाजिक,धार्मिक कार्यक्रमात सक्रीय सहभागी होऊन जनजागृती करणा-या दाभाडे परिवारातील माजी उपनगराध्यक्षा छाया दाभाडे यांनी ‘एक पेड मा के नाम’ हा उपक्रम राबवून वृक्षारोपण केले.छाया दाभाडे यांनी यापूर्वी देखील अनेक ठिकाणी वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन केले आहे.
शहरातील सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे व त्यांच्या पत्नी तथा माजी उपनगराध्यक्षा छाया दाभाडे यांचेसह परिवारातील सर्व सदस्य विविध धार्मिक,सामाजिक कार्यक्रमात सहभागी होत असतात.माजी उपनगराध्यक्षा छाया दाभाडे यांनी ‘एक पेड मा के नाम’ या उपक्रमाअंतर्गत मुलगा व मुलींसोबत वृक्षारोपण केले.छाया दाभाडे यांच्या निवासस्थानाजवळ पुरेशी जागा उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी घराशेजारी तसेच अन्य ठिकाणच्या मोकळ्या जागेवर वृक्ष लागवड करून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी स्विकारली.प्रत्येक व्यक्तीने मोकळ्या जागेवर केवळ एका वृक्षाची लागवड करून एक ते दोन वर्ष त्यांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारावी असे आवाहन त्यांनी केले.वाढत्या प्रदूषणाला आला घालण्यासाठी झाडांची संख्या वाढवणे हा एकमेव उपाय असल्याचे सांगितले.यापूर्वी आनंद दाभाडे,छाया दाभाडे यांचेसह त्यांच्या परिवारातील सदस्यांच्यावतीने शहरात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
No comments