संतुलित लोकसंख्या देशाची अर्थव्यवस्था बळकट करेल: डॉ.पी.डी.पाटील पारोळा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) वाढती लोकसंख्या ही देशाच्या ...
संतुलित लोकसंख्या देशाची अर्थव्यवस्था बळकट करेल: डॉ.पी.डी.पाटील
पारोळा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
वाढती लोकसंख्या ही देशाच्या सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय समस्यांना कारणीभूत ठरणारी गंभीर बाब आहे. या पार्श्वभूमीवर जनजागृतीपर कार्यक्रमांच्या माध्यमातून जागतिक स्तरावर ११ जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून पाळण्यात येतो. लोकसंख्येच्या संख्येनुसार कमी, जास्त आणि संतुलित असे तीन प्रकार असून विकसित भारताची अर्थव्यवस्था जास्तीची बळकट करावयाची असेल तर आपल्या देशाची लोकसंख्या ही संतुलित असणे गरजेचे आहे असे मत डॉ.पी. डी. पाटील यांनी मांडले.
पारोळा येथील किसान महाविद्यालयात दि. ११ जुलै रोजी राष्ट्रीय सेवा योजना एकक आणि भूगोल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. लोकसंख्या वाढीची जागतिक व भारतातील स्थिती’, ‘जनसंख्या धोरण’, लिंगसमानता, दारिद्र्य व उपासमार, तसेच ‘कुटुंब नियोजनाचे महत्त्व’ या विषयावर सखोल मार्गदर्शन करत भारत लवकरच सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून ओळख निर्माण करेल त्यामुळे ही बाब संधीसह आव्हानदेखील निर्माण करणारी असल्याचे देखिल त्यांनी स्पष्ट केले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वाय. व्ही. पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ.जी.एच. सोनवणे, आयक्युएसी समन्वयक डॉ.डी. बी. साळुंखे आणि डॉ.सी. एम. नेतकर होते. प्रास्ताविकात एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. काकासाहेब गायकवाड यांनी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्याविषयीचे हेतू आणि उद्दिष्ट स्पष्ट केलेत. कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते पृथ्वीगोलास पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.वाय. व्ही. पाटील यांनी वाढत्या लोकसंख्येचा जन्म- मृत्यूदर, आरोग्य, शिक्षण, नैसर्गिक संसाधने व रोजगार यावर होणारे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम दैनंदिन व्यवहारातील विविध उदाहरण आणि दाखल्यांचा माध्यमातून स्पष्ट केले. आजच्या तरुणाईने लोकसंख्या साक्षरताबाबत सजग राहून समाजात जनजागृती घडवून आणणे ही काळाची गरज असल्याचे मत उपप्राचार्य डॉ.जी.एच. सोनवणे यांनी मांडले. सुत्रसंचालन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. शशिकांत पाटील यांनी तर आभार डॉ. प्रफुल्ल ठाकरे यांनी मांडलेत. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी राजेंद्र केदार आणि स्वंयसेवक उपस्थित होते.
No comments