बी.बी. महामुनी यांनी रत्नागिरी अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला...!! जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून स्वागत..!! सौ. कलावती गवळी (रत्न...
बी.बी. महामुनी यांनी रत्नागिरी अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला...!! जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून स्वागत..!!
सौ. कलावती गवळी (रत्नागिरी जिल्हा ) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्र पोलीस दलात वरिष्ठ स्तरांवर मागील आठ दिवसांपूर्वी मोठी खांदेपालट झाली असून. यामध्ये राज्यभरांतील एकूण 22 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही फेरबदल महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या शिवाय नागपूर कोल्हापूर लातूर यवतमाळ नाशिक बुलढाणा रत्नागिरी आणि छ. संभाजीनगर यासारख्या ठिकाणीही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये रत्नागिरीचे नवे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून बाबुराव बी.बी. महामुनी यांनी रत्नागिरी अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून मावळत्या अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्याकडून पदभार स्वीकारला यावेळी जिल्हा नितीन बगाटे पोलीस अधीक्षकांच्या उपस्थित पुष्पगुच्छ देवुन त्यांचे स्वागत तरी त्यांना शुभेच्छा दिल्या. मावळत्या अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी रत्नागिरीत तत्कालीन पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्यासमवेत आपल्या कार्यकाळात अनेक महत्त्वांच्या जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडल्या बारस प्रकल्पासारख्या संवेदनशील बाबींसह त्यांनी विविध बंदोबस्तामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र जयश्री गायकवाड यांची यापूर्वी छ. संभाजीनगर येथे पोलीस उपायुक्त राज्य गुप्तवार्ता विभागात बदली झाली होती. मात्र सुधारित पदस्थापनेद्वारे त्यांची कोल्हापूर गुन्हे अन्वेषण विभागात बदली झाली आहे. जयश्री गायकवाड यांचा कणखर नेतृत्वशैली आणि अचूक निर्णय क्षमतेमुळे रत्नागिरी जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा दर्जा चांगलाच उंचावला होता. जयश्री गायकवाड यांनी रत्नागिरी जिल्ह्यात उपअधीक्षक ते अप्पर पोलीस अधीक्षक अशा विविध पदावर काम पाहिले आहे. तर अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून सलग अडीच वर्ष उत्तम कामगिरी बजावली आहे. आता रत्नागिरीच्या पोलीस प्रशासनात दोन्ही प्रमुख अधिकारी नव्याने रुजू झाले आहेत.
No comments