फैजपूर सह.साखर कारखाना वसाहत संविधान नगरमध्ये वर्षावास प्रवचन मालिका उद्घाटन सोहळा इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपू...
फैजपूर सह.साखर कारखाना वसाहत संविधान नगरमध्ये वर्षावास प्रवचन मालिका उद्घाटन सोहळा
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथे दि. १०/७/२०२५ रोजी भारतीय बौद्ध महासभेतर्फे वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान समाजसेवक अशोक भालेराव यांनी स्वीकारले व मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून वंदना घेण्यात आली. धम्म सेवक महेंद्र तायडे, पी.के. महाले बौद्धा चार्य, कामिनी तायडे मॅडम, लताताई मेढे यांनी वर्षावासाचे महत्व सांगितले सावदा नगरपरिषदेच्या तत्कालीन नगरसेविका नंदाताई लोखंडे यांनी गुरुपौर्णिमा निमित्ताने शुभेच्छा दिल्या. लक्ष्मीताई मेढे यांनी सुद्धा त्यांचे मनोगत व्यक्त केले.जि.संघटक वसुंधरा मेढे यांनी शुभेच्छा दिल्या.मान्यवरांचे स्वागत सविधान नगर मधील धम्म उपासक उपासिकांनी पुष्पगुच्छ देऊन केले.भारतीय बौद्ध महासभेचे यावल तालुका अध्यक्ष बी.डी.महाले सर, महिला ता.अध्यक्षा माया सुरेश तायडे, पारमिता महिला मंडळाच्या अध्यक्षा रेखा शैलेंद्र मेढे, रेखा आकाश मेढे,सुमन दिलीप मेढे,संगीता साळुंखे,कल्पना पोहेकर,नीलकंठ भालेराव धम्म सेवक विष्णू मेश्राम उपस्थित होते.समाजसेवक संतोष तायडे,संगीता तायडे,ज्योती वाघ,कुसुम लोखंडे,कल्पना भालेराव,अपर्णा तायडे, आशा भालेराव यांचे सहकार्य लाभले. एम.पी.जे.संघटना फैजपूरचे शहर अध्यक्ष रहीमउद्दीन, उपाध्यक्ष इकबाल खान यांची ही उपस्थिती होती.
No comments