Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पाळधी (जिल्हा जळगांव )येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भक्तिभावात संपन्न.

  पाळधी (जिल्हा जळगांव )येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भक्तिभावात संपन्न. विकास पाटील धरणगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) धरणगाव : पाळधी खुर्द ता...

 पाळधी (जिल्हा जळगांव )येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भक्तिभावात संपन्न.


विकास पाटील धरणगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

धरणगाव : पाळधी खुर्द ता. धरणगाव येथील सुगोकी लॉनवर सनातन संस्थेच्या वतीने आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सव अत्यंत भक्तिभावपूर्ण आणि उत्साही वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला सुमारे ३५० भाविक उपस्थित होते, तसेच स्थानिक पत्रकार बंधूंचीही उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अधिवक्ता श्री. निरंजन चौधरी (जळगाव) यांनी “हल्लीच्या काळात संघटनाचे महत्त्व” या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांनी समाजातील घटनांच्या उदाहरणांमधून संघटनेची गरज अधोरेखित केली. त्यांचा सत्कार आव्हाणी येथील धर्मप्रेमी श्री. ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद शिंदे यांनी “गुरूंचे कार्य, गुरुपौर्णिमेचे महत्त्व व गुरु तत्त्व” या विषयावर सखोल विवेचन केले. त्यांचा सत्कार पाळधी येथील धर्मप्रेमी श्री. दीपक पाटील यांनी केला. कार्यक्रमात सूत्रसंचालन चि. प्रदीप कुवर आणि कु. धनश्री दहिवदकर यांनी उत्तम प्रकारे पार पाडले. यावेळी गुरूंचे पूजन अत्यंत भक्तिभावाने पार पडले. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, सनातन संस्थेचे ग्रंथ व सात्त्विक साहित्य प्रदर्शन, आरोग्यविषयक माहिती व स्वरक्षण प्रात्यक्षिके या विविध उपक्रमांमुळे उपस्थित भाविकांनी अमूल्य अध्यात्मिक व सामाजिक माहिती अनुभवली.

या कार्यक्रमात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे व सतगुरू श्री. नंदकुमार जाधव (काका) यांचे मार्गदर्शनात्मक चलचित्रही दाखवण्यात आले, ज्यामुळे भाविकांना गुरुतत्त्वाची गोडी व गाभा अधिक जवळून अनुभवता आला. तसेच, पहलगाम (काश्मीर) येथे हिंदूंवर झालेल्या आक्रमणाचे जागृतीपर चलचित्र दाखवण्यात आले. या प्रसंगांनी उपस्थितांमध्ये हिंदु धर्माची स्थिती व सजगतेचे भान निर्माण केले. कार्यक्रमाच्या शेवटी सामूहिक प्रार्थना यू आणि गुरूप्रेमाच्या भावनेने युक्त वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सवाची सांगता करण्यात आली. हा सोहळा उपस्थित भाविकांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहणारा ठरला.

No comments