Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

एरंडोलमध्ये वृद्ध महिलेला बांधून ४० हजारांची लुट; शहरात भीतीचे वातावरण

  एरंडोलमध्ये वृद्ध महिलेला बांधून ४० हजारांची लुट; शहरात भीतीचे वातावरण प्रा. सुधीर महाले एरंडोल प्रतिनिधी : (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  ...

 एरंडोलमध्ये वृद्ध महिलेला बांधून ४० हजारांची लुट; शहरात भीतीचे वातावरण


प्रा. सुधीर महाले एरंडोल प्रतिनिधी :

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 एरंडोल शहरातील गांधीपुरा भागातील जयहिंद चौकात एका ५२ वर्षीय वृद्ध महिलेचे हातपाय आणि तोंड बांधून तिच्या अंगावरील सुमारे ४० हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना आज पहाटे २ ते ३ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जयहिंद चौकातील रहिवासी उषाबाई भिका बडगुजर (वय-५२) या काल रात्री (५ जुलै) आपल्या घराच्या लोखंडी गेटला कुलूप लावून झोपल्या होत्या. पहाटेच्या सुमारास चार अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यांनी उषाबाईंचे हातपाय दोरीने बांधले आणि तोंड रुमालाने बांधले. आरडाओरड केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देत, चोरट्यांनी त्यांच्या अंगावरील ८ ग्रॅम सोन्याचे दागिने, ६.५ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आणि सुमारे १,५५० रुपये रोख असा एकूण अंदाजे ४० हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला.

हातपाय बांधलेल्या अवस्थेत असलेल्या उषाबाईंनी सकाळी कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली आणि एरंडोल पोलीस ठाण्यात धाव घेतली. उषाबाई बडगुजर यांच्या तक्रारीवरून चार अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड व त्यांचे सहकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत.

घटनेची माहिती मिळताच, श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते, तसेच फॉरेन्सिक टीमचे पथकही घटनास्थळी दाखल झाले होते. शहरात जबरी चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, या घटनेने पोलिसांसमोर आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. पोलिसांनी या जबरी चोरीतील आरोपींबद्दल माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचेही समोर आले आहे.

No comments