adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फायनान्स कंपनीचे कर्मचारी असल्याचा बाहाणा, पैसे लुटणाऱ्या दोघांच्या आवळल्या मुसक्या... मौजपुरी पोलीसाची कामगिरी..!!

  फायनान्स कंपनीचे कर्मचारी असल्याचा बाहाणा, पैसे लुटणाऱ्या दोघांच्या आवळल्या मुसक्या...  मौजपुरी पोलीसाची कामगिरी..!!   सौ. कलावती गवळी (जा...

 फायनान्स कंपनीचे कर्मचारी असल्याचा बाहाणा, पैसे लुटणाऱ्या दोघांच्या आवळल्या मुसक्या...  मौजपुरी पोलीसाची कामगिरी..!! 



सौ. कलावती गवळी (जालना जिल्हा ) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 दिनांक 03/07/2025 रोजी फिर्यादी नामे शेख नुर शेख अमीन रा. इंदिरानगर ता. परतुर जि. जालना ह त्यांची अपे रिक्षा मध्ये सिमेंटच्या चुली विक्री करण्यासाठी आसपासच्या गावा खेडयामध्ये फिरत होते व त्यांच्या सर्व सिमेंट चुली विक्री करुन ते परत त्यांच्या गावी परतुर येथे जाण्यासाठी निघाले असता पोलीस ठाणे मोजपुरी हद्दीतील चितळी पुतळी फाट्याजवळ दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या अँपे रिक्षाला त्यांची गाडी आडवी लावली व अॅपे रिक्षाची चावी काढून घेतले असता फिर्यादी यांनी सदर अनोळखी इसमांना गाडी का आडवी लावली म्हणून विचारणा केली असता त्यांना सांगीतले कि, आम्ही फायनान्स चे कर्मचारी आहे. तुम्ही तुमच्या अँपे रिक्षाचा हप्ता भरला नाही. असे म्हणाले त्यावेळेस फिर्यादी त्यांना माझ्याकडे सध्या पैसे नाहित पुढच्या हप्तात माझे पैसे येणार आहे तेंव्हा मी भरुन टाकतो असे म्हणाले असता सदर अनोळखी इसमांन पैसे एकाने फिर्यादीची अॅपे रिक्षात बसुन पुढे घेऊन गेला व एक अनोळखी इसम हा फिर्यादी जवळ पैसांची मागणी करुन लागला तेंव्हा फिर्यादी यांनी चितळी येथील त्यांच्या मित्राकडून हात उसने पैसे घेऊन एक हजार रुपये दिले. त्यानंतर फिर्यादी यांनी त्यांच्या अँपे रिक्षाच्या डिक्कीमध्ये ठेवलेले धंदयाचे नऊ हजार रुपये हे सदर अनोळखी इसमांनी बळजबरीने काढून घेतले व फिर्यादीच्या अंगावर अँपे रिक्षाची चावी फेकून तेथून पळून गेले, अशा आशयाच्या फिर्यादीवरुन पोलीस ठाणे मौजपुरी जि. जालना येथे कलम 309 (4),352,3(5) भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने तसेच मा. पोलीस अधीक्षक साहेय, जालना, मा. अपर पोलीस अधीक्षक साहेब, जालना यांनी गुन्हे वैठकीमध्ये मालाविरुध्दचे गुन्हे उघडकिस आणणे बाबत बरोण्ठांनी दिलेल्या सुचना प्रमाणे तात्काळ गुन्हयाचे घटनास्थळी जाऊन फिर्यादी यांचेकडुन सविस्तर घटनाक्रम समजावुन घेतला त्यानंतर गुप्त बातमीदार मार्फत मिळालेल्या बातमीच्या आधारे आरोपी नामे 1) बालाजी ऊर्फ ज्ञानदेव नामदेव खरात रा.विरेगाव ता.जि.जालना 2) सुनिल दत्तु गावडे रा.चितळी पुतळी ता.जि. जालना यांना ताब्यात घेतले व त्यांना विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्यांची गुन्हा केल्याची कबुली दिली असुन आरोपीतांच्या ताब्यातुन फिर्यादी यांचा चोरी गेलेला माल व वाहने असा एकुण 02 लाख 75 हजार रुपयाचा मुद्येमाल हस्तगत करण्यात आलेला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास चालू आहे. सदर आरोपीतांना नमुद गुन्हयात अटक करुन मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने सदर आरोपीची दिनांक 07/07/2025 रोजी पावेतो पोलीस कोठडी दिली आहे.

तरी पोलीस ठाणे मौजपुरी तर्फे आवाहन करण्यात येते कि, अशाच स्वरुपाचे फायनान्स कर्मचारी असल्याचे भासवुन जबरी चोरीचे गुन्हे आपल्या हद्दीमध्ये घडलेले असल्यास पोलीस ठाणे मौजपुरी येथे संपर्क साधावा,

सदरची कामगीरी ही श्री. अजयकुमार बंन्सल साहेब, पोलीस अधीक्षक, जालना, श्री. आयुध नोपाणी साहेब, अपर पोलीस अधीक्षक, जालना, श्री. विशाल खांबे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग अंबड कॅम्प परतूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. मिथुन घुगे, सहा. पोलीस निरीक्षक तथा प्रभारी अधिकारी पो.स्टे मौजपुरी, पोउपनि श्री. विजय तडवी, सफी चंद्रकांत पवार, पोह/मच्छिद्र वाघ, दादासाहेव हरणे, भास्कर वाघ, भगवान खरात, पोअं/प्रशांत म्हस्के, प्रदिप पाचरणे, अविनाश मांटे, सदाशिव खैरे, धोंडीराम वाघमारे यांनी केली आहे.

No comments