adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भ्रष्टाचारांचा काळा अध्याय: वाई पोलीस ठाण्याचा पीएसआय अन् हवालदार 15 हजारांची लाच घेताना रंगेहाथ लाचलुचपत च्या जाळ्यात..!!

  भ्रष्टाचारांचा काळा अध्याय: वाई पोलीस ठाण्याचा पीएसआय अन् हवालदार 15 हजारांची लाच घेताना रंगेहाथ लाचलुचपत च्या जाळ्यात..!!  सौ. कलावती गवळ...

 भ्रष्टाचारांचा काळा अध्याय: वाई पोलीस ठाण्याचा पीएसआय अन् हवालदार 15 हजारांची लाच घेताना रंगेहाथ लाचलुचपत च्या जाळ्यात..!!


 सौ. कलावती गवळी ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 सातारा जिल्ह्यातील वाई पोलीस ठाणेतील कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक बिपीन बाळकृष्ण चव्हाण आणि पोलीस हवालदार उमेश दत्तात्रय गहिण यांनी सामूहिक महिलेच्या अत्याचारांचा गुन्हा दाखल न करण्यासाठी तक्रारदाराकडे जवळपास 20 हजारांची मागणी केली होती, अखेर पीएसआय आणि हवालदाराला 15 हजारांची लाच घेताना सातारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागांच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावून लाच स्वीकारताना ताब्यात घेतले आहे, पोलीस उपनिरीक्षक बिपीन बाळकृष्ण चव्हाण व पोलीस हवालदार उमेश दत्तात्रय गहीन अशी लाच प्रकरणी कारवाई करण्यात आलेल्याची नावे आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीवरून तक्रारदार यांनी वाई पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध महिलेने दिलेल्या तक्रारीवरून सामूहिक अत्याचारांचा गुन्हा दाखल करणेकरिता लाच मागणीबाबत दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने (दि. 4 ) जुलै 2025 रोजी वाई पोलीस ठाण्याच्या आवारांत पडताळणीमध्ये पोलीस हवालदार चव्हाण याने उपनिरीक्षक चव्हाण यांच्या करिता लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते, त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारदारांवर गुन्हा दाखल न करण्याकरिता पंचासक्षम रुपये 20 हजारांची लाच मागणी करून तडजोडीअंती 15 हजार रुपये लाच रक्कम स्विकारताना प्रशासकीय इमारतीमधील पोलीस बीट अंमलदार कक्षात सापळा लावला होता, उपनिरीक्षक चव्हाण व हवालदार गहिण यांच्या समवेत तक्रारदार यांच्याशी पंचासमक्ष झालेल्या पडताळणीमध्ये तक्रारदारांस शिवीगाळ दमदाटी करून हाताने चापटी मारून अटक करण्याची भिंती दाखवून लाच मागणीस प्रोत्साहन दिले, तक्रारदारांने लाच मागणीस होकार दर्शवताच त्या सांगेल तेव्हा साक्षीदार व्हायचं असे बोलून हवालदार गहिण याने लाच मागणीस प्रोत्साहन दिले, सदर लाच स्विकारताना लाच लाचलुचपत विभागांच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले सदरची ही कारवाई सातारा लाचलुचपत विभागांचे उपनिरीक्षक राजेश वाघमारे पोलीस हवालदार नितीन गोगावले गणेश ताटे निलेश राजपुरे यांनी केली या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे करीत आहेत.

No comments