Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

थेपडे विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

  थेपडे विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी  जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील  (संपादक -:- हेमकांत गायकवाड)    म्हसावद तालुक्यातील जळग...

 थेपडे विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी 


जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

   म्हसावद तालुक्यातील जळगाव येथे महर्षी वेद व्यास यांच्या जयंती निमित्ताने थेपडे विद्यालयांमध्ये गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पी. डी. चौधरी सर  यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की,

"गुरू म्हणजे केवळ ज्ञान देणारा शिक्षक नसून तो विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा दाखवणारा दीपस्तंभ असतो. गुरुविण कोण दाखवील वाट या ओवी नुसार गुरूंचे मार्गदर्शन आपल्या जीवनात खूपच उपयोगी असते. विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल निर्माण करतो तो खरा शिक्षक असतो. गुरूशिवाय जीवन शिक्षण अपूर्ण आहे. यश प्राप्तीसाठी गुरूंचे मार्गदर्शन अत्यावश्यक असून त्यांचे अनमोल मार्गदर्शन जीवनाला आदर्श बनविते. आपले प्रथम गुरु आपले आई-वडील असतात. म्हणून विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांचा मानसन्मान करावा. शिक्षक आपल्या जीवनाला आकार देत असतात. त्यामुळे शिक्षकांच्या  मार्गदर्शनानुसार आपण वाटचाल केली तर  जीवन सर्वांगसुंदर झाल्याशिवाय राहणार नाही." यावेळी पी. डी. चौधरी सरांनी पौराणिक काळातील अनेक गुरु-शिष्यांच्या जीवनातील आदर्शवत उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श आपल्या जीवनात अवलंब करण्याचे विचार प्रतिपादित केले.  विचार मंचावरती विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री जी डी बच्छाव सर व पर्यवेक्षक श्री के पी पाटील सर व सर्व ज्येष्ठ शिक्षक शिक्षिका उपस्थित होते. विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनींनी सहकार्य केले .

No comments