निवासी शाळेमध्ये तासिका तत्वावर सहायक शिक्षकांची नियुक्ती जिमाका वृत्तसेवा/ अहिल्यानगर: (संपादक -:- हेमकांत गायकवाड) सहायक आयुक्त, समाजक...
निवासी शाळेमध्ये तासिका तत्वावर सहायक शिक्षकांची नियुक्ती
जिमाका वृत्तसेवा/ अहिल्यानगर:
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सहायक आयुक्त, समाजकल्याण विभागांतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींसाठीच्या निवासी शाळेत तासिका तत्वावर सहायक शिक्षक नियुक्त केले जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी १५ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात, अहिल्यानगर येथे उपस्थित राहावे, असे आवाहन सहायक आयुक्तांनी केले आहे.
कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेत मराठी, भूगोल व इतिहास (माध्यमिक) विषयासाठी सहायक शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. जामखेड तालुक्यातील अरोळेनगर येथील निवासी शाळेत समाजशास्त्र विषयासाठी, तर श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथील मुलींच्या निवासी शाळेत हिंदी व समाजशास्त्र (माध्यमिक) विषयासाठी सहायक शिक्षकांची आवश्यकता आहे.
सहायक शिक्षक पदासाठी उमेदवार एम.ए. व बी.एड. अर्हताधारक असावा. 15 जुलै 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीची संधी दिली जाईल. तसेच सामाजिक न्याय विभागाच्या शासन निर्णयातील अटी व शर्ती उमेदवारांना लागू राहतील, असेही कळविण्यात आले आहे.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
No comments