adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

प्रेयसी मुलासोबत लॉजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकरांने पाहिले आणि संपविले जीवन ! सातारा शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद !

  प्रेयसी मुलासोबत लॉजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकरांने पाहिले आणि संपविले जीवन !  सातारा शहर  पोलीस ठाण्यात घटनेची नोंद !  कलावती गवळी (...

 प्रेयसी मुलासोबत लॉजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकरांने पाहिले आणि संपविले जीवन !

 सातारा शहर  पोलीस ठाण्यात घटनेची नोंद !


 कलावती गवळी ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 आपल्या प्रेयसीला दुसऱ्या मुलासोबत लॉज मधून बाहेर पडताना प्रियकरांनी पाहिले अन् गळफास घेवुन प्रियकरांने जीवन संपविले ही धक्कादायक घटना साताऱ्यातील उपनगरांत शनिवारी सायंकाळी घडली, याबाबत सातारा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून शहरांतील संभाजीनगर परिसरांतील एका 18 वर्षीय तरुण आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होता, बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने पहिल्या वर्षाला ऍडमिशन ही घेतले होते, कॉलेजमधील बारावीत शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीसोबत वर्षभरांपासून दोघे एकत्र फिरायचे, भेटायचे, त्यातून त्यांचे प्रेम संबंध जुळले होते, मात्र त्यातच शनिवारी ती तरुणी दुसऱ्या मुलासोबत लॉजमध्ये गेली होती, ती मुलासोबत लॉजमधून बाहेर पडताना प्रियकरांने तिला पाहिले होते, त्यामुळे तो अस्वस्थ होता, त्यांनी त्याच्या मोठ्या भावाला फोन केला होता, माझे कोमल ( बदललेले नाव ) सोबत प्रेम संबंध आहेत, पण ती आज मला दुसऱ्या मुलासोबत लॉजमधून बाहेर पडताना दिसली मला धोका आहे, मी आता जगणार नाही असे म्हणून फोन कट केला, या प्रकरणानंतर मोठ्या भावाने लहान भावाचा शोध घेण्यात सुरुवात केली, भावाच्या फोनवर फोन केला पण फोन बंद होता, त्यामुळे अन्य एका मित्राला घेवुन लहान भावाचा शोध घेतला परंतु तेथेही तो सापडला नाही, त्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारांस जानाई मळाई डोंगरांच्या पायथ्याजवळ ओढ्यातील जांभळीच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचे मोठ्या भावाच्या निदर्शनास आले, त्यानंतर याची माहिती सातार शहर पोलिसांना देण्यात आली, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेवुन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला सातार शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे, ती तरुणी कोण? मोबाईल उघडणार रहस्य संबंधित मृत तरुणाचा मोबाईल पोलिसांनी हस्तगत केला आहे, त्याच्या मोबाईल मधून संबंधित तरुणीची ओळख पटणार आहे, ती तरुणी कोण आहे? याची माहिती आता सातारा शहर पोलीस घेत आहेत.

No comments