थकीत मालमत्ता करावर “शास्ती माफी अभय योजना” — कर भरणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! चोपडा प्रतिनिधी संपादक हेमकांत गायकवाड चोपडा (दि.३) — जळगाव ज...
थकीत मालमत्ता करावर “शास्ती माफी अभय योजना” — कर भरणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी!
चोपडा प्रतिनिधी
संपादक हेमकांत गायकवाड
चोपडा (दि.३) — जळगाव जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील मिळकतधारकांसाठी आनंदाची बातमी! शासनाच्या आदेशानुसार “प्रोत्साहनात्मक शास्ती माफी अभय योजना” राबविण्यात येत आहे. या योजनेद्वारे मालमत्ता कराच्या थकीत रकमेवर लावण्यात आलेली दंडात्मक शास्ती (Penalty) अंशतः ५०% पर्यंत माफ करण्यात येणार आहे.
कोण लाभ घेऊ शकतो?
• ज्यांनी शास्ती वगळता संपूर्ण थकीत मालमत्ता कराची रक्कम भरली आहे, ते मिळकतधारक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
• यासाठी संबंधित नगरपरिषदेकडे विहित नमुन्यात अर्ज करावा लागेल.
• अर्जासोबत खालील कागदपत्रांची छायाप्रत जोडावी लागेल:
• आधार कार्ड
• मालमत्ता कराची मागणी बिल
• भरलेल्या रकमेची पावती
महत्त्वाच्या अटी:
1. ही योजना फक्त एकदाच लागू राहणार आहे.
2. फक्त 19 मे 2025 पूर्वीच्या थकीत करावरची शास्तीच माफ केली जाणार.
3. ज्यांना ५०% पेक्षा जास्त शास्ती माफी हवी असेल, त्यांच्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवावा लागेल.
काय करावं?
आपण जर थकीत मालमत्ता कर भरायचा विचार करत असाल, तर ही सुवर्णसंधी आहे. त्वरित नगरपरिषद किंवा नगरपंचायतीकडे जाऊन संपूर्ण थकीत कर (शास्ती वगळता) भरून शास्ती माफीचा लाभ घ्या.
शासनाच्या व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ही योजना राबवली जात असून, नागरिकांनी वेळ न घालवता लवकरात लवकर अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
(आयुष प्रसाद)
जिल्हाधिकारी, जळगाव
तारीख: २ जुलै २०२५

No comments