आदिवासी वनपट्टा धारकांना शेती कसण्यासाठी मंजूर डि पी द्या चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा जि.जळगाव येथील आदिवासी पेसा ...
आदिवासी वनपट्टा धारकांना शेती कसण्यासाठी मंजूर डि पी द्या
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा जि.जळगाव येथील आदिवासी पेसा गावातील वनपट्टेधारकांना वनजमिनीवरती त्यांच्या उदरनिर्वाह करण्यासाठी दि. 8/10/2024 रोजी टीएसपी अंतर्गत प्रशासकीय मान्यता कार्यालयीन मंजूर आदेश झालेला असून.तरी प्रशासकीय मान्यता कार्यालयीन आदेश गेल्या आठ महिने उलटून गेले तरी अजून पर्यंत डिमांड नोट भरणा केलेले नाही,व तसा कारणही दाखविलेले नाही,
तसेच डिमांड भरणा करण्यासाठी हें दुसरं विनंती पत्र असून,आजतागत त्या मागील पत्राचे कोणते ही उत्तर आलेले नाही.तसेच आदिवासी भागामध्ये पाण्याची पातळी एक हजार ते बारा शे फूट खोल पाण्याची पातळी असल्याने त्या ठिकाणी सौर ऊर्जा पॅनल चालणे शक्य नाही, तरी आदिवासी वनपट्टा आधारकांना त्याचे उद्धार निर्वाह जीवन जगावे म्हणून त्याचे डिमान नोट आपल्या स्तरावर भरणा करून जे पारंपारिक विज विद्युत वितरण आहे त्याचे पोलाचे तात्काळ कामकाज चालू करावे वनपट्टे आधारक विद्युत वितरण विभाग जिल्हा मुख्य अभियंता जळगाव यांच्याकडे मागणी केली. निवेदन
उप सरपंच प्रमोद बारेला कर्जाणे विजू बारेला, भिकन बारेला, गिलदार बारेला, धरमसिंग बारेला कालूसिंग बारेला, व सर्वे पट्टेधारक उपस्थित होते
प्रतिक्रिया : आदिवासी भागात डोंगराळ असून त्या ठिकाणी पाण्याची पातळी हजार ते बाराशे फूट खाली असल्याने त्या ठिकाणी सौर पॅनल चालणे शक्य नाही म्हणून त्या ठिकाणी पारंपारिक वीज विद्युत आवश्यक आहे उप सरपंच प्रमोद बारेला
No comments