अजित पवारांनीच मुख्यमंत्री व्हावे:- राज्य महिला आयोगांच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर स्पष्ट बोलल्या..!! सौ. कलावती गवळी ( प्रतिनिधी ) (संपाद...
अजित पवारांनीच मुख्यमंत्री व्हावे:- राज्य महिला आयोगांच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर स्पष्ट बोलल्या..!!
सौ. कलावती गवळी ( प्रतिनिधी )
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुंबईत आज राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाच्या मुंबईत मेळावा सुरू आहे. या मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादीच्या आणि राज्य महिला आयोगांच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी अजित पवारांनीच मुख्यमंत्री व्हावे असे राष्ट्रवादीच्या उपनेत्या आणि राज्य महिला आयोगांच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर स्पष्ट बोलल्या. गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदावरून चांगली चर्चा पाहायला मिळत होती. आणि या चर्चेत अजित पवारांचे नाव कायम घेतल्या जात होतं. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस मधील उपमुख्यमंत्री अजित पवार गटांच्या महिला मेळावा होत आहे. यावेळी रूपाली चाकणकरांनी अजित पवारांचे विशेष कौतुक करीत अजित दादा तुम्ही जो निर्णय घेतला त्या निर्णयासोबत आम्ही सर्व महिला आहोत. यासाठी हा मेळावा घेतला आहे. आज या मेळाव्यासाठी सर्व समाज घटकांतून महिला आल्या आहेत येणाऱ्या काळात तुम्हीच या राज्यांचे मुख्यमंत्रीपद भूषवावे, ते देण्यासाठी ही महिला शक्ती असावी राज्यांचे नेतृत्व बदलण्याची ताकद या महिला शक्तीत आहे. त्यामुळे आता तरी अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावे, अजित पवार हे नेहमीच राज्यांतील तमाम जनतेसाठी अहोरात्र प्रयत्नशील, असतात असे त्यांचे राज्यांच्या राजकीय वर्तुळात नेतृत्व आहे, त्यामुळे अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावे असे माझे स्पष्ट मत आहे असे राज्य महिला आयोगांच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांनी आपलं मत प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट व्यक्त केले आहे.
No comments