adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

ट्रॅक्टर चोर वडगावातून जेरबंद एमआयडीसी पोलिसांची कारवाई

 ट्रॅक्टर चोर वडगावातून जेरबंद  एमआयडीसी पोलिसांची कारवाई सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर :- तालुक्यातील हिंगण...

 ट्रॅक्टर चोर वडगावातून जेरबंद  एमआयडीसी पोलिसांची कारवाई


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर :- तालुक्यातील हिंगणगाव येथुन ट्रक्टर चोरी करणा-या गुन्हेगारास पकडण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. बातमीची हकीकत अशी की,दि. १९ जुलै २०२५ रोजी फिर्यादी नामे एकनाथ दगडु झावरे (वय-६८ वर्ष रा.हिंगणगाव ता.जि अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली की,दि.१९ जुलै २०२५ रोजी ट्रॅक्टर क्रमांक एम एच १६ ए एम ३७०१ हा कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेला आहे.वगैरे मचकुराचे फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गु रजि नंबर ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्हयाचा तपास करीत असतांना गोपनिय व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे सपोनि.माणिक चौधरी यांना माहिती मिळाली की, सदरील गुन्हा हा गुन्हेगार नामे विठठल बबन गांडुळे याने केला आहे.व आरोपी हा वडगाव गुप्ता भागात आहे अशी माहिती मिळाल्याने एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी तपास पथकातील अमंलदार यांना सदर ठिकाणी पाठविले. सदर आरोपी नामे विठठल बबन गांडुळे वय-४३ वर्ष रा. देवटाकळी ता.शेवगाव जि अहिल्यानगर यास ताब्यात घेवुन त्यांचेकडे सदर गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याचे कबुल केले आहे.त्यांचे कडुन सदर गुन्हयात चोरी केलेला १,२०,०००/-रु किमतीचा सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक एम एच १६ ए एम ३७०१ असा नंबर असलेला, ५०,०००/- रु किमतीची चोरीची बजाज कंपनीची प्लॅटीना मोटारसायकल नंबर एम एच १९ सी एन ८२२१ असा असलेली तसेच ५०,०००/-रु किमतीची विना नंबरची स्कुटी असा एकुण २,२०,००० /-रुपये (दोन लाख वीस हजार रुपये) चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.सदरची कामगिरी श्री.सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री. वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक,श्री.अमोल भारती अति.चार्ज उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग अहिल्यानगर यांचे मार्गदर्शानाखाली एमआयडीसी  पोलीस ठाण्याचे सपोनि.माणिक बी. चौधरी,पोसई मनोज मोंढे, पोसई विकास जाधव,सफौ राकेश खेडकर,पोहेकॉ गणेश चौधरी,पोहेकॉ राजु सुद्रीक, पोहेकॉ सचिन आडबल,पोहेकॉ देविदास खेडकर,पोकॉ/किशोर जाधव,पोकॉ नवनाथ दहिफळे, तसेच दक्षिण मोबाईल सेल अहिल्यानगर चे पोकॉ/राहुल गुंडु यांनी केली आहे.

No comments