पुणे हादरले, कोंढव्यात अभियंता तरुणीवर कुरिअर बॉयने केला बलात्कार...!! चेहऱ्यावर स्प्रे मारला आणि डाव साधला ! सौ. कलावती गवळी ( पुणे जि...
पुणे हादरले, कोंढव्यात अभियंता तरुणीवर कुरिअर बॉयने केला बलात्कार...!! चेहऱ्यावर स्प्रे मारला आणि डाव साधला !
सौ. कलावती गवळी ( पुणे जिल्हा ) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
बोपदेव घाटातील युवतीवरील गॅपरेप, स्वारगेट बस स्थानक परिसरांत तरुणीवरील अत्याचारांनंतर आता कोंढव्यातील उच्चभ्रू सोसायटीतील संगणक अभियंता तरुणीवरील बलात्कारांच्या घटनेने पुणे शहर हादरले आहे, पीडिता घरी एकटी असल्याची संधी साधत कुरिअर देण्याच्या बहाण्याने आरोपीने तरुणीच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. 2 जुलै) सायंकाळी घडली आहे, या घटनेने विद्येचे माहेरघर संस्कृतिक शहरांत महिला मुली खरंच सुरक्षित आहे का? असा सवाल आता उपस्थित होत आहे घटनेनंतर पसरलेल्या आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत, एका 25 वर्षीय तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, यानुसार 28 ते 30 वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पीडिता तरुणी ही कल्याणीनगर येथील आयटी कंपनीत कामाला आहे, ती दोन वर्षापासून कोंढवा परिसरांतील एका उच्चभ्रू सोसायटी तिच्या भावासोबत राहते घटनेच्या दिवशी तिचा भाऊ परगावी गेला होता, आणि हीच संधी साधून बुधवारी सायंकाळी कुरिअर बॉयने घरात प्रवेश करत तरुणींच्या चेहऱ्यावर स्प्रे मारुन बलात्कार केला आहे, एवढ्यावरच न थांबता त्याने मोबाईल मध्ये देखील छायाचित्र कैद केले आहे, व मी परत येईन असा देखील त्याने मोबाईलमध्ये मेसेज दिला आहे असेही पीडितेने म्हटले आहे, घाबरलेल्या तरुणीने घटनेची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर परिमंडळ 5 चे पोलीस उपायुक्त डॉ.राजकुमार शिंदे कोंढवा पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, पुणे शहरांत कायदा व सुव्यवस्था रामभरोसेवर महाराष्ट्रांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस अन् अजित दादा पवारांवर विरोधी पक्षाकडून चांगलीच टीका होत आहे

No comments