Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भूमिगत गटारीत काम करणाऱ्या दोघांचा बळी,ठेकेदारावर गुन्हा दाखल

  भूमिगत गटारीत काम करणाऱ्या दोघांचा बळी,ठेकेदारावर गुन्हा दाखल  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर (दि११):- जिल्...

 भूमिगत गटारीत काम करणाऱ्या दोघांचा बळी,ठेकेदारावर गुन्हा दाखल 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि११):-जिल्ह्यातिल संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी रोडवरील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल शेजारी सुरू असलेल्या सांडपाणी प्रकल्पाच्या भूमिगत गटार कामात गुरुवारी (दि.१०) रोजी घडलेल्या दुर्घटनेत आता दुसऱ्या कामगाराचा देखील मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.रियाज जावेद पिंजारी (वय २०,रा.मदीना नगर,संगमनेर) याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.यापूर्वी अतुल रतन पवार (वय.१९,रा.संजय गांधी नगर) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता.या दुर्घटनेनंतर ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन निरपराध तरुणांचा बळी गेल्यानंतर शहरात संतापाची लाट उसळली आहे. घटनास्थळी कोणतीही सुरक्षा साधने,गॅस डिटेक्टर किंवा ऑक्सिजन पुरवठ्याची व्यवस्था न करता काम करणाऱ्या मजुरांना गटारात उतरवण्यात आले होते,ही पालिकेची आणि ठेकेदाराची अत्यंत गंभीर दुर्लक्षाची बाब आहे.ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहे

No comments