अट्रावल येथील सत्कार विद्या मंदिर विद्यालयात बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायदा 2012 या विषया अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन भरत कोळी याव...
अट्रावल येथील सत्कार विद्या मंदिर विद्यालयात बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायदा 2012 या विषया अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
भरत कोळी यावल ता.प्र.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
तालुका विधी सेवा समिती यावलच्या वतीने यावल तालुक्यातील अट्रावल येथील सत्कार विद्या मंदिर विद्यालयात बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायदा 2012 या विषया अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावल तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा यावल न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीश आर. एस. जगताप यांच्या मार्गदर्शनानुसार आज अट्रावल येथील सत्कार विद्या मंदिर विद्यालयामध्ये कायदेविषयक जनजागृती शिबिर घेण्यात आले. यावेळी मुलांना पोक्सो कायद्याचे जुजबी ज्ञान देऊन त्यांना समाजातील विकृत मानसिकतेपासून आपले रक्षण कसे करावे, यासाठी "गुड टच बॅड टच" च्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आले. भारतात बाल लैंगिक अत्याचाराचे प्रमाण मोठे आहे. अलीकडच्या काळात मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे बाल लैंगिक अत्याचाराचा घटनांमध्ये आणखीन वाढ होत असताना आपल्याला दिसून येत आहे. या अनुषंगाने मुलांमध्ये याविषयी जनजागृती करणे क्रमप्राप्त ठरते. त्यासाठी यावल न्यायालयाने विविध शाळांमध्ये "पोक्सो" कायदा तसेच "गुड टच बॅड टच" विषयी मुलांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते शशिकांत वारूळकर हे होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अट्रावल गावचे पोलीस पाटील पवन कुमार पाटील हे होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक शाळेचे मुख्याध्यापक उमाकांत चौधरी हे होते तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन सी वाणी यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समांतर विधी सहाय्यक अजय बढे, हेमंत फेगडे यावल न्यायालयाचे वरिष्ठ लिपिक संजीव तडवी तसेच सत्कार विद्या मंदिर विद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
No comments