जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त विरावली गावात तरुणांना सक्षम करण्यासाठी कृषी कन्या कडून प्रेरणादायी उपक्रम भरत कोळी यावल ता.प्र. (संपादक -:-...
जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त विरावली गावात तरुणांना सक्षम करण्यासाठी कृषी कन्या कडून प्रेरणादायी उपक्रम
भरत कोळी यावल ता.प्र.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
विरावली (ता. यावल): ११ जुलै २०२५ रोजी जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून विरावली गावात विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावर्षीचा थीम होता — "तरुणांना न्याय्य आणि आशादायक जगात त्यांना हवी असलेली कुटुंबे निर्माण करण्यासाठी सक्षम करणे", आणि त्यावर आधारित कार्यक्रम राबवण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात जि.प.मराठी शाळे मध्ये कृषिकन्या यांनी केली, कार्यक्रमाच्या वेळी शाळेच्या मुध्याध्यापिका सौ. योगेश्वरी धनगर व श्रीमती. प्रियांका पाटील, सौ. सुवर्णा पाटील (शिक्षक वृंद) आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याध्यापकांनी आपल्या मनोगतातून लोकसंख्या वाढीचे समाजावर होणारे परिणाम, त्यावरील उपाययोजना आणि कुटुंब नियोजनाचे महत्त्व पटवून दिली.
कृषीकन्यांन कडून पथनाट्य सादर करण्यात आले, ज्यामध्ये कुटुंब नियोजन, स्त्री-पुरुष समतेचे महत्त्व, वयात येणाऱ्या मुला-मुलींच्या आरोग्याविषयी माहिती देण्यात आली. या उपक्रमात पोस्टर प्रदर्शन, आणि समूह चर्चा घेण्यात आल्या. यावेळी गावकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. कृषीकन्यांनी आपले विचार मांडत जागरूकतेचा संदेश दिला. कार्यक्रमाचे नियोजन कृषीकन्या धनश्वेता अहिरे, प्रज्ञा गजरे, ऐश्वर्या सोनवणे, सृष्टी डोंगरे, प्रतीक्षा गावीत, विशाखा सोनवणे,यांनी केले होते.
"लोकसंख्या नियोजन ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी प्रत्येक नागरिकाने जागरूक असणे आवश्यक आहे," पत्नाट्या द्वारे कृषीकन्या यांनी व्यक्त केले. या उपक्रमासाठी डॉ. उ.पा.कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. शैलेश तायडे, प्रा. बी.एम.गोणशेटवाड, व प्रा. एम.पी.भोले यांचे मार्गदर्शन लाभले. हा उपक्रम गावात सकारात्मक बदल घडवण्यासाठी एक पाऊल ठरला असून, पुढील काळात असेच उपक्रम राबवले जातील, असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.
No comments