adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सा.बां.विभागाने दखल घेत नांदुरा रोडवर पडलेला तो भला मोठा खड्डा चुरी, डांबर टाकून बुजविला

सा.बां.विभागाने दखल घेत नांदुरा रोडवर पडलेला तो भला मोठा खड्डा चुरी, डांबर टाकून बुजविला   अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड...

सा.बां.विभागाने दखल घेत नांदुरा रोडवर पडलेला तो भला मोठा खड्डा चुरी, डांबर टाकून बुजविला  


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापूर -:- नांदुरा रोडवर रस्त्याच्या मध्यभागी पडलेला खड्डा तात्काळ बुजविण्यात येवून रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी   प्रहार जनशक्ती पक्षाचे अजय टप यांनी ४ जुलै रोजी केली होती. या निवेदनाची तात्काळ दखल घेत सा.बां.विभागाच्या १३ जुलै रोजी रस्त्यातील खड्डा बुजविण्यात आला.


याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील अनके रस्त्यांची अवस्था पहिल्या पावसात दयनीय अशी झाली. रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच वर्दडीचा रस्ता असलेल्या नांदुरा रोडवर तर रस्त्याच्या मध्यभागी भलामोठा खड्डा पडल्याने हा खड्डा अपघाताला आमंत्रण देत होता. सदर रस्त्याच्या झालेल्या दयनीय अवस्था व रस्त्याच्या मधोमध पडलेला भलामोठा खड्डा पाहता सार्वजनिक बांधकाम उपविभाग - श्रेणी १ मलकापूर यांनी याकडे तातडीने लक्ष देवून तो खड्डा बुजविण्यात यावा, अन्यथा त्या खड्ड्यात बेशरमचे झाड लावून आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी दिला होता. 

याची तातडीने सा.बां.विभागाने दखल घेत काल नांदुरा रोडवर पडलेला तो भला मोठा खड्डा चुरी, डांबर टाकून बुजवित नागरिकांना, वाहन चालकांना व पादचार्‍यांना दिलासा दिला आहे.

No comments