अहिल्यानगरच्या शिरपेचात मानाचा तुरा..ऑल इंडिया ओपन चॅम्पियनशिप स्पर्धेत डेड लिफ्टमध्ये आदिश तनपुरे सुवर्णपदकाचा मानकरी सचिन मोकळं अहिल्या...
अहिल्यानगरच्या शिरपेचात मानाचा तुरा..ऑल इंडिया ओपन चॅम्पियनशिप स्पर्धेत डेड लिफ्टमध्ये आदिश तनपुरे सुवर्णपदकाचा मानकरी
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
नगर (दि.२३):-जागतिक पावर लिफ्टिंग फेडरेशन ( WRPF )च्या वतीने दादरा- नगर हवेली येथील सिल्वासा स्मार्ट सिटी येथे नुकत्याच पार पडलेल्या ऑल इंडिया ओपन चॅम्पियनशिप स्पर्धेत डेड लिफ्टमध्ये अहिल्यानगर येथील खेळाडू आदिश महेश तनपुरे याने सुवर्ण पदक मिळविले आहे. त्याच्या या यशामुळे त्याचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होतं आहे.त्याच्या या यशामागे त्याचे कोच देवदत्त गुंडू यांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन आहे.
या स्पर्धेत आदिश तनपुरे याने 90 किलो वजन गटात सहभाग घेत डेडलिफ्ट प्रकारात आपले अत्यंत दर्जेदार प्रदर्शन करत कौशल्य सादर केले आणि त्याला सुवर्ण पदक मिळाले.आदिशच्या या यशामुळे त्याला आता पुढे जाऊन नॅशनल स्पर्धेत अधिकृत भाग घेता येणार आहे.यावेळी कोच देवदत्त गुंडू म्हणाले की, मुलांनी अभ्यासाबरोबर आपल्या शरीराची ही काळजी घेतली पाहिजे तसेच विविध स्पर्धेत सहभागी झाले पाहिजे.आदिशने मिळवलेल्या सुवर्णपदकामुळे अहिल्यानगरच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तसेच शहरात एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
No comments