adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शिरपूर शहरात विद्यार्थी गुणगौरव सोहळा व सेवानिवृत्त कर्मचारींचा सत्कार सोहळा संपन्न

  शिरपूर शहरात विद्यार्थी गुणगौरव सोहळा व सेवानिवृत्त कर्मचारींचा सत्कार सोहळा संपन्न शिरपूर प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) शिरपूर ...

 शिरपूर शहरात विद्यार्थी गुणगौरव सोहळा व सेवानिवृत्त कर्मचारींचा सत्कार सोहळा संपन्न



शिरपूर प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

शिरपूर शहरात विद्यार्थी गुणगौरव सोहळा व  सेवानिवृत्त कर्मचारींचा सत्कार सोहळा  नुकताच संपन्न झाला याबाबत सविस्तर वृत्त असे की ऑल इंडिया सेनजी महासंघ ट्रस्ट नई दिल्ली, महाराष्ट्र नाभिक महामंडळ महाराष्ट्र नाभिक कर्मचारी संघटना, जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थींचा गुणगौरव सोहळा तसेच सेवानिवृत्त कर्मचारी बांधवांचा सत्कार सोहळ्याचं आयोजन शिरपूर शहरातील शंकरनाना लांस येथे रामविकास च्या जोडी च्या माध्यमातून करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत सेनाजी महाराज आणि शिवरत्न जिवाजी महाले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन कार्यक्रमाचे अध्यक्ष ऑल इंडिया सेनजी महासंघ ट्रस्ट नई दिल्ली चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मनोहर खोंडे सर अखिल भारतीय जीवा सेना संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दिनेश महाले,राष्ट्रीय नाभिक जनसेवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गुलाबराव वरसाळे महाराष्ट्र नाभिक महामंडळ चे धुळे जिल्हा सचिव बी. के.सूर्यवंशी,नाभिक मंच चे  संपादक भगवान चित्ते,महाराष्ट्र नाभिक कर्मचारी संघटनेचे धुळे जिल्हा अध्यक्ष दिलीप येशी,नाभिक हितवर्धक संस्थेचे धुळे जिल्हा अध्यक्ष जगदीश सोनगडे,राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे धुळे जिल्हा अध्यक्ष गोकुळ ईशी,खोंडे ज्वेलर्स चे संचालक संतोष खोंडे,नाभिक समाज कर्मचारी हितवर्धक संस्थेचे जिल्हा अध्यक्ष पंकज भदाणे,कर्मचारी संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा रंजना सूर्यवंशी,महाराष्ट्र नाभिक महामंडळ च्या जिल्हा उपाध्यक्षा पल्लवी शिरसाठ आदी मान्यवरांच्या शुभ हस्ते इतिहासात प्रथमताच इलेक्ट्रॉनिक रिमोट कंट्रोल पद्धतीने करण्यात आले

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ऑल इंडिया सेनजी महासंघ ट्रस्ट नई दिल्ली चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मनोहर खोंडे यांच्या सह शिरपूर,धुळे, नंदुरबार, जळगांव, सुरत, शहर, तालुका व जिल्ह्यातील अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते  नाभिक समाजातील १५० गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान पत्र ट्रॉफी स्कूल पॅड देऊन गौरविण्यात आले

तर विविध विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी बांधव हिरालाल ठाकरे, नरेंद्र खोंडे, आर.एन.पवार सर प्रकाश जगताप, सुधाकर वारुळे, ऋषिकेश जाधव, रामचंद्र पवार, गिरधर शिरसाठ, प्रवीण शिरसाठ विजय सोनवणे  आदी सेवानिवृत्त कर्मचारी बांधवांचा सेवापूर्वी सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात  मनोहर खोंडे सर, भगवान चित्ते, दिनेश महाले, गुलाबराव वरसाळे, पंकज भदाणे सर, आर.एन.पवार सर, रविंद्र खोंडे सर, पल्लवी शिरसाठ, आदी प्रमुख मान्यवरांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या विद्यार्थींना शिक्षण क्षेत्रात नवीन दिशा दाखवत त्यांचे पुढील आयुष्य सफल व्हावे म्हणून संबोधित केले. कार्यक्रमाचे आयोजन राम विकास च्या जोडी ने केले असून कार्यक्रमाला यशस्वी रीतीने संपन्न करण्यासाठी ऑल इंडिया सेनजी महासंघ ट्रस्ट नई दिल्ली चे जिल्हा अध्यक्ष श्रीरामचंद्र येशी यांनी अथक मेहनत घेतली  तर जितेंद्र सनेर सर,गोपाल वरसाळे सर यांनी कार्यक्रमाची धुरा सांभाळत कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन रविंद्र सोनगिरे सर यांनी तर प्रास्ताविक विकास सेन यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी आलेल्या सर्वच प्रमुख मान्यवर समाज बांधव व विद्यार्थींनी सुरूची भोजनाचा स्वाद घेत रामविकास च्या जोडीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले.

No comments