चोपडा तंत्रनिकेतन महाविद्यालयात इंडक्शन प्रोग्राम व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न. प्रतिनिधी रविंद्र कोळी (संपादक -:- हेमका...
चोपडा तंत्रनिकेतन महाविद्यालयात इंडक्शन प्रोग्राम व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न.
प्रतिनिधी रविंद्र कोळी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा (ता. चोपडा) – येथील 'महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, श्रीमती शरच्चद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंजीनियरिंग & पॉलीटेक्निक), चोपडा' महाविद्यालयात नवोदित विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम व मागील वर्षात उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष मा. भैय्यासाहेब अँड संदीप सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला इंडक्शन प्रोग्राम अंतर्गत नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या शैक्षणिक, प्रशासकीय व सामाजिक कार्यप्रणालीची माहिती देण्यात आली. विविध विभागप्रमुखांनी आपापल्या शाखांची ओळख करून दिली तसेच विद्यार्थ्यांना शिस्त, प्रकल्प कार्य, इंटर्नशिप यांचे महत्त्व पटवून दिले.. प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.आर एच पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी तंत्रशिक्षणाचे महत्त्व, उद्योग क्षेत्रातील संधी व व्यक्तिमत्व विकासावर भर देत प्रेरणादायी भाषण केले."व व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे फ्रान्स येथे स्थित माजी विद्यार्थी मोहित शशिकांत शिसोदे यांनी नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना आपला महाविद्यालयीन अनुभव सांगितला यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांमधून पूर्वा विलास राणे, विधी दीपक पाटील व मयूर ज्ञानेश्वर चौधरी या विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले ,पालक प्रतिनिधी श्रीमती रेखा ठाकरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले,प्रसंगी संस्थेचे प्राचार्य श्री व्ही एन बोरसे यांनी त्यांच्या भाषणात तुम्ही ज्या वळणावर आज उभे आहात, तिथून पुढील प्रवास तुमच्या इच्छाशक्तीवर, कष्टावर आणि योग्य मार्गदर्शनावर अवलंबून आहे. आमचे सर्व शिक्षकवर्ग तुमच्या या प्रवासात सदैव मार्गदर्शक म्हणून पाठीशी असतील," असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रसंगी अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष मा. भैय्यासाहेब अँड संदीप सुरेश पाटील यांनी
"विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवताना शिक्षण ही सर्वात महत्त्वाची प्रक्रिया आहे. आपली संस्था केवळ शैक्षणिक ज्ञान देणारी नव्हे, तर विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास साधणारी संस्था आहे," तसेच मागील शैक्षणिक वर्षात एक्सलंट मनांकन प्राप्त झालेले तंत्रनिकेतन महाविद्यालयात आपण एक नवीन अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले असे सांगितले.
गुणगौरव सोहळ्यात गत शैक्षणिक वर्षात विविध शाखांमध्ये उत्कृष्ट गुण संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.यात उन्हाळी २०२५ च्या परीक्षेत तृतीय वर्ष संगणक विभागातून मयूर ज्ञानेश्वर चौधरी या विद्यार्थ्याने ९२.९४% गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळविला यावेळी पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे वातावरण उत्साही व प्रेरणादायी होते. प्रसंगी संस्थेच्या सचिव मा.ताईसाहेब डॉ स्मिता संदीप पाटील तंत्रशिक्षण समिती सदस्य डॉ हनुमंतराव गंगाधरराव साळुंखे तंत्रनिकेतन समन्वयक श्री ए. एन. बोरसे व पालक प्रतिनिधी श्री अमोल पाटील हे उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कमलेश एस. पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. एस.इ. शिसोदे यांनी केले. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सकारात्मक शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरला.
No comments