रावेर तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदांचे आरक्षण जाहीर, ४२ ग्रामपंचायतींचे महिला सांभाळणार कारभार! रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (...
रावेर तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदांचे आरक्षण जाहीर, ४२ ग्रामपंचायतींचे महिला सांभाळणार कारभार!
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तहसीलमधील एकूण ८२ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले
यावेळी फैजपूर उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे यांच्या उपस्थितीत दुपारी ४ वाजता सोडत काढण्यात आली. या सोडतीत ४२ ग्रामपंचायतींमध्ये महिलाची सरपंचपदी लागणार वर्णी!
दिनांक ८ जुलै मंगळवार रोजी सकाळी ११ वाजता रावेर तहसील कार्यालयात तहसीलदार बी.ए. कापसे यांच्या उपस्थितीत ८२ ग्रामपंचायतींचे प्रवर्गनिहाय आरक्षण काढण्यात आले. त्यानंतर दुपारी ४ वाजता फैजपूर उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे यांच्या उपस्थितीत तहसीलदार बी ए कापसे निवासी नायब तहसीलदार संजय तायडे ,नायब तहसीलदार भूषण कांबळे यांनी आरक्षण सोडत व्यवस्थित पार पाडली उपस्थितीत महिला आरक्षण सोडत काढण्यात आली. आरक्षण सोडत वेळी सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी ग्रामपंचायत सरपंच सदस्य पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामपंचायतनिहाय आरक्षण तपशील (महिला आरक्षणासह):
अनुसूचित जाती (पुरुष) : पाडळे खुर्द, खिरोडा प्रा. रावेर, वाघोडे खुर्द, गौखेडा, मस्कावद बु., मांगी चुनवडे.
अनुसूचित जाती (महिला): विवरे खुर्द, कुंभारखेडा, सावखेडा बु., धामोडी, कळमोडे, खानापूर मुंजाळवाडी.
अनुसूचित जमाती (पुरुष) : मस्कावदसीम, निरूळ, नेहेते, पुनखेडा, सुदगाव.
अनुसूचित जमाती (स्त्री): चिनावल, भोर, दोधे, थेरोळे, वाघोड, कोचूर बु.
नाम (पुरुष): वाघोदा बु., कर्जड, थोरगव्हाण, सिंगत, खिर्डी बु., वाघाडी, सुनोडे, विवरे बु., अजंदे, विवरे बु., दसनूर, बलवडी.
नाम प्र (महिला): रनगाव, रामजीपूर, आंदलवाडी, अहिरवाडी, उटखेडा, खिर्डी खुर्द, अजनाड, निंभोरा बु., धुरखेडा, तासखेडा, गौरखेडा.
सर्वसाधारण (महिला) : कोचूर खुर्द, उदळी खुर्द, निंबोल, भोकरी, मस्कावद खुर्द, राजोदा, रायपूर, शिंगाडी, गाते, विटवे, शिंदखेडा, बक्षीपूर, मोरगाव बु., कोळदे, ऐनपूर, पुरी, गोलवाडे, वडगाव, सावखेडा.
सर्वसाधारण (पुरुष) : भातखेडा, खिरोडा प., यावल, रसलपूर, केर्हाळे खु., नांदूरखेडा, केर्हाळे बु., उदळी बु., तांदलवाडी, तामसवाडी, मोरगाव बु., खिरवड, अटवाडे, पातोंडी, , सुलवाडी, रेंभोटा, कांडवेल बु.
या आरक्षण सोडतीमुळे तालुक्यातील ग्रामपंचायतींची निवडणुकीसाठी भविष्यातील दिशा स्पष्ट झाली आहे.
No comments