भव्य मोर्चात आपल्या हक्क अधिकारासाठी कर्तव्य आणि जबाबदारी भावनेने सहभागी व्हा जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) दिनांक ९ जुलै र...
भव्य मोर्चात आपल्या हक्क अधिकारासाठी कर्तव्य आणि जबाबदारी भावनेने सहभागी व्हा
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दिनांक ९ जुलै रोजी देशव्यापी संप आणि त्यातून निघणारे भव्य दिव्य मोर्चे यात महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील कर्मचारी,कंत्राटी,संघटीत/असंघटित क्षेत्रातील कर्मचारी आणि कामगार,शेतकरी,शेतमजूर,भूमिहीन मजदूर यांनी सहभागी व्हावे
केंद्र सरकारने ४ कामगार संहिता अंमलात आणलेल्या आहेत ज्यामुळे आपल्याला संप,आंदोलन,धरणे,निदर्शने,बहिष्कार करता येणार नाही,सेवाअंतर्गत अन्यायाविरुद्ध अपील नसेल,कामाचे तास १२ असेल,क्षुल्लक कारणावरून संघटनांची शासनमान्यता एकतर्फी रद्द करण्याचा अधिकार शासनाला असेल,१०० वर्षापासुन अनेक लढ्यातुन संघर्षातून मिळवलेले सेवा आर्थिक,सामाजिक सुरक्षितता लाभ एकतर्फी काढून घेण्यात येत आहेत ही दडपशाही आहे
जुन्या पेन्शन योजनेसाठी PFRDA कायदा रद्द करावा
कंत्राटी पद्धत रद्द करून सेवेत कायम करण्यात यावे व मा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार किमान मासिक वेतन ३० हजार रुपये देण्यात यावे,
आठव्या वेतन आयोगातील समितीचे गठण करण्यात यावे
वेतन त्रुटी बाबत अन्याय दूर करावा
जनतेच्या श्रमातून आणि पैशातून उभारलेली सार्वजनिक राष्ट्रीय उपक्रमांची विक्री करून बँक,एलआयसी विमा,आरोग्य,शिक्षणसेवा,डिफेन्स,इलेक्ट्रिसिटी,रेल्वे,विमानसेवा,अशा संस्थां भांडवलदारांचे घश्यात घालण्याचे काम वेगाने सुरू आहे असे धोरण रद्द करण्यात यावे.
९ जुलै चा लढा म्हणजे
भांडवलदार विरुद्ध श्रमिक ,
गुलामी विरुद्ध स्वातंत्र्य
हुकुमशाही विरुद्ध लोकशाही
शोषण विरुद्ध हक्क अधिकार
बेरोजगारी विरुद्ध रोजगार
अन्याया विरुद्ध न्याय
आपण कर्मचारी सुजाण नागरिक आहात,अन्यायाच्या विरोधात लढण्याची संघटीत शक्ति आपल्याजवळ आहे.सर्वांनी २ तास वेळ काढा आणि जिल्हास्तरावरील मोर्चात सहभागी व्हा ही नम्र विनंती
अध्यक्ष /सरचिटणीस/ कार्याध्यक्ष/कोषाध्यक्ष/उपाध्यक्ष/संयुक्त सचिव/ सल्लागार/मानद अध्यक्ष तथा सर्व राज्य व विभागीय पदाधिकारी,जिल्हा अध्यक्ष सचिव महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषदेचे परिषद कर्मचारी महासंघ
अध्यक्ष/सरचिटणीस (सर्व)
राज्य प्रवर्ग संघटना संलग्न महासंघ
No comments