कु. हिताली झोपे सी ए परीक्षा उत्तीर्ण इदू पिंजारी फैजपूर - (संपादक -:- हेमकांत गायकवाड) न्हावी येथील भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची...
कु. हिताली झोपे सी ए परीक्षा उत्तीर्ण
इदू पिंजारी फैजपूर -
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
न्हावी येथील भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी कु. हिताली रवींद्र झोपे ही नुकतीच सी ए परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाली आहे. येथील प्रगतशील शेतकरी रवींद्र झोपे यांची ती कन्या होय. सातत्यपूर्ण अभ्यासाने, कठोर परिश्रमाने आणि आत्मविश्वासाने हितालीने हे यश मिळविले आहे.तिने मिळविलेल्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष शरद महाजन, उपाध्यक्ष अनिल लढे ,चेअरमन प्रा. डॉ.के जी पाटील, सेक्रेटरी जयंत बेंडाळे ,सर्व संचालक मंडळ, जिल्हा दूध संघाचे संचालक नितीन चौधरी, महेश भारंबे, तसेच मुख्याध्यापक व्ही बी वारके, उपमुख्याध्यापिका सौ. संगीता फिरके, पर्यवेक्षक ए एस ठोसर , सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,नी कौतुक केले आहे.
No comments